Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 एप्रिल 2021 | शुक्रवार | ABP Majha
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. विरारमधील विजय वल्लभ कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू, रात्री उशिरा आयसीयूतील एसीचा स्फोट झाल्याची माहिती
2. राज्यात कडक लॉकडाऊनला पुन्हा सुरुवात, 'ब्रेक द चेन' अंतर्गत अधिक कडक निर्बंध, 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत नियम लागू
3. लॉकडाऊन सुरु होताच नियमांची कडक अंमलबजावणी सुरु, नियम मोडणाऱ्यांवर पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे वर दंडात्मक कारवाई
4. महाराष्ट्रात काही दिवसांनी कडक लॉकडाऊन, दोन-चार दिवसांनी आणखी कडक निर्बंध, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं सुतोवाच
5. देशभरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या आज तीन महत्त्वाच्या बैठका, राज्यांचे मुख्यमंत्री, ऑक्सिजन निर्मात्यांशी चर्चा
6. महाराष्ट्रातील 13 विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं, कोरोना निर्बंधांमुळं ऑफलाईन परीक्षा शक्य नाही, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
7. राज्याला ऑक्सिजन मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य
8. दररोज 60 हजार रेमडेसिवीर द्या, औषधाच्या पुरवठ्यासाठी पत्राद्वारे राज्य सरकारची केंद्राकडे मागणी
9. ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राकडे रवाना, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची माहिती, एक्स्प्रेसमध्ये ऑक्सिजनचे 7 टँकर
10. 1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठीची नोंदणी 28 एप्रिलपासून, कोविड पोर्टलवर सुरु होणार नोंदणी