Sindhudurga Chipi Airport : चिपी विमानतळ कोकणासाठी ठरणार वरदान, पर्यटनाला अच्छे दिन!
कोकणाच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून चिपी विमानतळाकडे (Kokan sindhudurga chipi airport) पाहता येईल. त्यासोबतच चिपी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनदृष्ट्या रोजगार उपलब्ध होईल.
Chipi Airport : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. तर केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे ऑनलाईन पद्धतीने दिल्लीतून या लोकार्पण सोहळा उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. त्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच आज अलाईन एअर विमानातून जे प्रवासी विमान उतरणार आहेत त्या प्रवाशांचे स्वागत स्वतः मुख्यमंत्री करणार आहेत. कोकणाच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून चिपी विमानतळाकडे पाहता येईल. त्यासोबतच चिपी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनदृष्ट्या रोजगार उपलब्ध होईल.
Sindhudurg : आज चिपी विमानतळाचं लोकार्पण, मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन विमानसेवा सुरू होण्याची सर्वांची इच्छा होती. सर्व कोकणवासीयांचे स्वप्न विमानसेवा आजपासून सुरू होईल. उद्घाटनाची सगळी तयारी झालेली आहे. सगळ्या मान्यवरांच्या स्वागताची तयारी झालेली आहे. अतिशय चांगल्या पद्धती चा कार्यक्रम उद्या या ठिकाणी विमानतळाचे उद्घाटन उद्घाटनाचा होईल आणि जे स्वप्न कोकणवासीयांचं आहे ते पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न मुख्यमंत्री व सगळ्यांनीच केले. या ठिकाणी विमानसेवा सुरू होते म्हणजे आमची जबाबदारी संपली असं नाही, तर भविष्यामध्ये जास्तीत जास्त विमानसेवा या ठिकाणी सुरू होतील यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही शिर्डीला व दिल्लीला विमानसेवा सुरू व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. सिंधुदुर्गाची भूमी ही देवभूमी मानली जाते. त्यामुळे सर्व समावेशक विमानतळ आणि टुरिझम ला याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे फार मोठ्या पद्धतीने क्रांती घडणार आहे.
चिपी विमानतळ चालू होईल त्यानंतर मोठ्या प्रमाणात कोकणात पर्यटन दृष्ट्या सर्व विकसित होईल. नवीन व्यवसाय करण्याची संधी लोकांना मिळेल. पर्यटक मोठ्या प्रमाणात वाढल्या नंतर त्यांना राहण्याची सोय स्थानिक लोकांनी करायला हवी. त्यामुळे पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतो आणि सिंधुदुर्गचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो. भोगवे गावातील ब्लु फ्लॅग मानांकन मिळाल्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात देश विदेशी पर्यटक येतील. यातुन पर्यटन दृश्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित कोकणचा विकास होईल. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू झाल्यानंतर पर्यटन दृश्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. याच कारण म्हणजे चिपी विमानतळावरून ब्लु फ्लॅग मानांकन मिळालेल्या भोगवे समुद्र किनारा 8 किलोमीटर असून मालवण सिंधुदुर्ग किल्ला 14 किलोमीटर तर वेंगुर्ले समुद्र किनारा 35 किलोमीटर तर राष्ट्रीय महामार्ग कुडाळ 25 किलोमीटर असल्याने चारी बाजूंनी पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्याचा विकास होणास मदत होईल.