एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा इफेक्ट, आंबोलीत विनापरवानगी नो एन्ट्री!
एबीपी माझाने आंबोलीचं वास्तव समोर आणल्यानंतर पोलिस प्रशासनाने या उपाययोजना केल्या आहेत.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत वाढत्या गुन्हेगारीला 'एबीपी माझा'ने वाचा फोडल्यानंतर त्याचा तातडीने परिणाम दिसून आला आहे. कारण आंबोलीतल्या कोणत्याही पर्यटनस्थळांवर संध्याकाळी 6 ते पहाटे 6 वाजेपर्यंत विनापरवाना जाण्यास पोलिसांनी मनाई केली आहे.
अर्थात ही मनाई सध्या एका महिन्यापुरती असेल.
आंबोलीतल्या महादेवगड पॉईंट, कावळेसाद, हिरण्यकेशी, नांगरदास आणि मुख्य धबधब्यावर ही बंधने घालण्यात आली आहेत. या पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी आंबोलीतल्या पोलिस दूरक्षेत्रावर त्याची कल्पना द्यावी लागेल.
गेल्या काही दिवसांपासून आंबोलीमध्ये मृतदेह सापडण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. एबीपी माझाने आंबोलीचं वास्तव समोर आणल्यानंतर पोलिस प्रशासनाने या उपाययोजना केल्या आहेत.
कुणाचाही खून करायचा आणि त्याची विल्हेवाट लावायची ती आंबोलीत. गुन्हेगारांच्या या अड्ड्यामुळे आंबोली बदनाम झालं आहे.
- सांगलीतल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहाची विल्हेवाट इथेच लावण्यात आली होती.
- पावसाळ्यात गडहिंग्लजच्या दोघांचा दरीत कोसळून मृत्यू झाला
- 9 नोव्हेंबर रोजी गडहिंग्लजच्या एका शिक्षकाचा मृतदेह दरीत सापडला
- तर 16 नोव्हेंबर रोजी आणखी दोन अनोळखी मृतदेह याच दरीत सापडले
याविषयी 'एबीपी माझा'ने वाचा फोडली. यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चं कलम 36 अंतर्गत नियमन आदेश जारी करण्यात आला आहे. यानुसार संध्याकाळी 6 ते सकाळी 6 या कालावधीत आंबोलीतील पर्यटनस्थळी जाण्यासाठी पोलिसांना माहिती द्यावी लागणार आहे.
संबंधित बातम्या
दोन गावांचा वाद, आंबोली धबधब्याचं नाव बदलण्याच्या हालचाली
माकडांना खाऊ देताना पर्यटक आंबोली घाटातील दरीत कोसळला
सिंधुदुर्ग : आंबोली घाटात वाळूचा ट्रक दरीत कोसळला, एकाचा मृत्यू
संबंधित व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
मुंबई
भारत
महाराष्ट्र
Advertisement