सोलापूर श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेवर निर्बंध; मंदिर परिसरात चार दिवसांची संचारबंदी
Solapur News : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रेतील धार्मिक विधींना सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.
Solapur News : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या (Siddheshwar Maharaj Yatra) पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. 12 जानेवारी रात्री बारा वाजल्यापासून ते रविवार दि. 16 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर परिसरात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेवर प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, यात्रेच्या कालावधीत मंदिर परिसरात भाविक आणि नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, धार्मिक विधींकरिता जाणाऱ्या मानकऱ्यांना पोलीस आयुक्तालयाकडून प्रवेशपास घेणं आवश्यक असणार आहे.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रेतील धार्मिक विधींना सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. 12 ते 16 जानेवारीपर्यंत श्री सिद्धेश्वर मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात संचारबंदी असणार आहे. पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेवर प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. विविध राज्यांतून भाविक सोलापुरात सिध्देश्वर महाराजांच्या दर्शनाला येत असतात. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच यात्रेसाठी केवळ 50 मानकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यासर्व मानकऱ्यांना प्रशासनाच्या वतीनं पासेस देण्यात येणार आहेत. तसेच मंदिर परिसराच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना देखील पासेस देण्यात येणार आहे. संचारबंदीच्या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हरिभाई देवकरण शाळेसमोरील रस्ता, भुईकोट किल्ला परिसर ते चार पुतळा असे चार ही बाजूने संचारबंदी लागू असणार आहे. त्यामुळे काळात सर्वसामान्य नागरिकांना या भागातील रस्त्यांचा वापर करता येणार नाहीये.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रेतील धार्मिक विधींना सोमवारपासून प्रारंभ झाला. यात्रेला परवानगी देणं आणि प्रवेशपासवरून पुजारी, मानकरी यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. 500 जणांना पायी वारीची परवानगी द्या, अशी मागणी पुजारी आणि मानकऱ्यांनी केली होती. परंतु, प्रशासनानं केवळ 50 वारकऱ्यांना पायी वारी करण्याची परवानगी दिली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी आदेश पारीत करत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. कोरोना आणि ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी, तसेच कायदा-सुव्यवस्था ठेवण्यासाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे पोलीस आयुक्त बैजल यांनी काढलेल्या आदेशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी लागू करण्यात आल्यानं शहर आणि जिह्यासह परराज्यांतील भाविकांना या ठिकाणी येण्यास परवानगी नाही.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन डिजिटल पास सक्तीचे करण्यात आले आहेत. यात्रेच्या धार्मिक विधींसाठी उपस्थित राहणारे पुजारी, नंदीध्वजांचे मानकरी यांना पोलीस प्रशासनाकडून प्रवेशपास घेणे बंधनकारक आहे. मैदानावर मनोरंजन-करमणुकीची दुकानं, पूजासाहित्य विक्री आणि अन्य दुकानं लावण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाने लागू केलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेश यात दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह