एक्स्प्लोर
शिवसैनिकाचा प्रामाणिकपणा, रशियन पर्यटकाची बॅग परत केली!
दक्षिण भारताच्या सहलीवर गेलेल्या शिवसैनिकाने त्याला मिळालेले रशियन कुटुंबाचे पासपोर्ट, कागदपत्रे आणि रोख रक्कम असलेली बॅग रशियन पर्यटकांना परत करत भारतीयांच्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.
![शिवसैनिकाचा प्रामाणिकपणा, रशियन पर्यटकाची बॅग परत केली! Shivsena worker honesty he has returned the bag to Russian tourist latest update शिवसैनिकाचा प्रामाणिकपणा, रशियन पर्यटकाची बॅग परत केली!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19132454/Shivsenik-Bandu-Kerwadkar-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बेळगाव : दक्षिण भारताच्या सहलीवर गेलेल्या शिवसैनिकाने त्याला मिळालेले रशियन कुटुंबाचे पासपोर्ट, कागदपत्रे आणि रोख रक्कम असलेली बॅग रशियन पर्यटकांना परत करत भारतीयांच्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.
बेळगाव जिल्हा शिवसेना उपप्रमुख बंडू केरवाडकर हे आपल्या कुटुंबीयांसोबत दक्षिण भारताच्या सहलीवर गेले होते. तामिळनाडू मधील वेल्लोर कृष्णगिरी येथील जिंजाकोट किल्ला बघताना त्यांना किल्ल्यात बॅग सापडली. बॅग उघडून पाहिल्यावर त्यातील पासपोर्ट बघून ही बॅग कोणातरी परदेशी पर्यटकाची असेल हे समजले. पोलिसांकडे किंवा तेथे असणाऱ्या अन्य लोकांकडे बॅग दिली तर ती त्या परदेशी पर्यटकाला देतील याची खात्री वाटली नाही म्हणून त्यांनी स्वतःच त्यांचा शोध घेण्याचे ठरवले.
किल्ल्यात इकडे तिकडे फिरुन पाहिल्यावर त्यांना कोणी आढळले नाही. शेवटी जिथे बॅग सापडली तेथेच थांबण्याचे बंडू केरवाडकर यांनी ठरवले. अखेर सहा तासांनी रशियन पर्यटक आपल्या बॅगच्या शोधात तेथे आले. त्यांच्याशी संवाद साधून ती बॅग त्यांचीच असल्याची खात्री करुन केरवाडकर यांनी ती बॅग रशियन पर्यटकांना परत केली.
रशियातील मास्को शहरातील पास्को कुटुंबीयांच्या डोळ्यात बॅग परत मिळाल्यावर आनंदाश्रू तरळले. त्यांनी केरवाडकर यांना मिठी मारून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. दोन पासपोर्ट आणि रोख रक्कम असलेली बॅग मिळाल्यावर पास्को कुटुंबीयांनी दहा हजार रुपये रोख बक्षीस म्हणून घेण्याचा आग्रहही केला पण केरवाडकर यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. ‘तुम्ही आमच्या देशाच्या दौऱ्यावर आला आहात आणि तुम्ही आमच्या देशाचे पाहुणे असल्यामुळे आम्ही तुमची काळजी घ्यायला पाहिजे, मदत करायला पाहिजे.’ असे सांगून रोख रक्कम केरवाडकर यांनी नाकारली.
![Shivsenik Bandu Kerwadkar-](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19185435/Shivsenik-Bandu-Kerwadkar-.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)