एक्स्प्लोर
एसटी डेपोतील मॅकेनिकला महिलांकडून बेदम चोप
जळगाव बस डेपोत यांत्रिक विभागात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला सहकार्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या एका मॅकेनिकला आज (गुरुवार) शिवेसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.

जळगाव : जळगाव बस डेपोत यांत्रिक विभागात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला सहकार्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या एका मॅकेनिकला आज (गुरुवार) शिवेसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. जळगाव बस डेपोत यांत्रिक विभागात आदिल शेख हा मॅकेनिक म्हणून कार्यरत आहे. दोनच दिवसांपूर्वी त्याने याच विभागातील एका प्रशिक्षणार्थी महिलेची छेड काढली होती. या घटनेची शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी थेट डेपोतच धडक दिली. या महिला कार्यकर्त्यांनी शेख याला आज (गुरुवार) बस स्थानक परिसरात पकडून बेदम मारहाण केली. तसेच शेख याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. या संपूर्ण घटनेनंतर महामंडळाने पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला निलंबित केले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक























