एक्स्प्लोर

शिवसेनेकडून शेतकरी कर्जमाफीचं ऑडिट, रावते ऑडिटर!

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते स्वत: ऑडिटरच्या भूमिकेत राहणार आहेत.

उस्मानाबाद: राज्य सरकारची महत्त्वकांक्षी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेचं ऑडिट शिवसेना करणार आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते स्वत: ऑडिटरच्या भूमिकेत राहणार आहेत. दिवाकर रावते राज्यातील सर्व जिल्ह्यात जाऊन कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठका घेणार आहेत. 28 जूनपासून रावते कर्जमाफीच्या आढावा बैठका घेण्यास सुरुवात करणार आहेत. कर्जमाफीचा लाभ किती शेतकर्‍यांना मिळाला, किती शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, याची शहानिशा करणार आहेत. 28 जून रोजी नांदेड, लातूर तर 29 जून रोजी उस्मानाबाद, बीड जिल्हा दौर्‍यात कर्जमाफीचे ऑडिट करणार आहे. या ऑडिटच्या अहवालानंतर शिवसेना कर्जमाफीबाबतची भूमिका ठरणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. 24 जून 2017 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना राज्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी ही कर्जमाफी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ म्हणून ओळखली जाते. या योजनेचा लाभ पीक कर्जासह मध्यम मुदतीच्या कर्जधारकांनाही होणार आहे. दिनांक  1 एप्रिल 2012  ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी खास योजना दीड लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (One Time Settlement) राबवण्यात येत आहे. त्यामध्ये पात्र थकबाकी रकमेच्या 25 टक्के किंवा दीड लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी आहे, त्या रकमेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. 2012 – 2013 ते 2015 – 2016 या चार वर्षांत ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे, परंतु 30 जून 2016 रोजी ते थकबाकीदार असतील अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्यांनी कर्ज मुदतीत फेडले आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून पीक कर्जाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येईल. यांना’ कर्जमाफीतून वगळलं!  राज्यातील आजी-माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, केंद्र आणि राज्य सरकारचे तसेच निमशासकीय संस्था आणि अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या कर्जमाफीसाठी पात्र असणार नाहीत. करदाते आणि व्हॅट भरणारे व्यापाऱ्यांनाही कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफीची एकंदर स्थिती (एप्रिल 2018) 33 राष्ट्रीयकृत आणि 30 जिल्हा सहकारी बँकेत 46,52,810 खाती मंजूर असून 24 हजार 536 कोटी 74 लाख इतकी रक्कम शासनाने बँकांना दिली आहे. बँकांनी त्यातील 14 हजार 387 कोटी 72 लाख इतकी रक्कम लाभार्थ्यांना वाटप केली आहे. शासनाने प्रचंड निधी वाटप केला असला तरीही जिल्हानिहाय आणि गावनिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसणे ही यंत्रणेतील चूक आहे. त्यामुळे खरे लाभार्थी कोण असा सवालच माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. संबंधित बातम्या  शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कसा झाला? शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सPankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Embed widget