Varun Sardesai : राणा दाम्पत्याला पोलीस घेऊन जातील, त्याला विरोध करु नका; वरूण सरदेसाईंचे शिवसैनिकांना आवाहन
Shivsena : शिवसैनिकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नये असं शिवसेना युवानेते वरुण सरदेसाई यांनी केलं.
मुंबई: राणा दाम्पत्याला पोलीस घेऊन जातील त्यावेळी त्याला विरोध करु नका. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वागू नका असं आवाहन शिवसेना युवा नेते वरुण सरदेसाई यांनी केलं आहे. शिवसेनेला आव्हान देणारा अजून जन्माला यायचा आहे असंही ते म्हणाले.
शिवसेना युवानेते वरुण सरदेसाई म्हणाले की, "मातोश्रीला आव्हान दिल्यानंतर शिवसैनिकांनी गेली दोन दिवस पहारा दिला. याबद्दल सर्व शिवसैनिकांचे आभार. पण आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी शिवसैनिकांनी घ्यावी. राणा दाम्पत्याला पोलीस घेऊन जातील, त्याला विरोध करु नये."
राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका मागे घेतल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. त्यावेळी राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांची माफी मागावी अशी मागणी करत शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या घराला घेरावा घातला. त्यामुळे परिस्थिती चिघळत असल्याचं चित्र होतं.
पोलिसांनी वारंवार विनंती केल्यानंतर शिवसैनिकांनी ही भूमिका घेतली. पण यामुळे वादावर पडदा पडला असं दिसताना पुन्हा एकदा परिस्थिती चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली. राणा दाम्पत्यांना घेण्यासाठी आलेल्या पोलिसांना विरोध करत राणा दाम्पत्यांनी पोलिसांनाच उलटा जाब विचारल्याचं चित्र होतं. आम्हाला धमक्या देणाऱ्या संजय राऊतांना अटक करा, आमच्यावर गुन्हा का दाखल करता असा सवालही त्यांनी पोलिसांना विचारला.
दरम्यान, ताज्या माहितीनुसार राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर 153 अ हे कलम लावण्यात आलं आहे. उद्या राणा दाम्पत्याला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणे, धर्म, वंश आणि भाषेच्या आधारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि समाजाची शांतता भंग करणे असे आरोप या कलमांतर्गत करण्यात आले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha