एक्स्प्लोर
शिवसेना 15 दिवसात लोकसभा उमेदवार ठरवणार
शिवसेना पुढच्या पंधरा दिवसात लोकसभा, तर दोन महिन्यात विधानसभा उमेदवार निश्चित करणार आहे.
![शिवसेना 15 दिवसात लोकसभा उमेदवार ठरवणार Shivsena to decide Loksabha candidates in next 15 days latest update शिवसेना 15 दिवसात लोकसभा उमेदवार ठरवणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/23131227/Uddhav-Thackeray-opposed-nanar-refinery-project.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : 2019 च्या निवडणुकांसाठी शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरत आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची चाचपणी करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. पुढच्या पंधरा दिवसात लोकसभा उमेदवार, तर दोन महिन्यात विधानसभा उमेदवार निश्चित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढच्या महिन्याभरात पूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत.
नाशकात काल उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, रवींद्र मिर्लेकर आणि स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील पाच लोकसभा आणि 36 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला.
पूर्व आणि पश्चिम विदर्भाची आढावा बैठक नागपूरमध्ये रवीभवनात 11 मे रोजी घेण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अरविंद नेरकर यांच्यासह स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत विदर्भातील 11 लोकसभा आणि 84 विधानसभा मतदारसंघांसाठी चाचपणी केली जाणार आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या 8 लोकसभा आणि 48 विधानसभा उमेदवार चाचपणीसाठी पुढच्या आठवड्यात पुण्यात बैठक होणार आहे, तर ठाणे-कोकणच्या पाच लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघाच्या चाचपणीसाठी ठाण्यात बैठक होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
क्राईम
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)