एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सामना'तील बुरखाबंदीच्या अग्रलेखावरुन संजय राऊत यांची माघार
बुरखाबंदीची मागणी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी केली नाही. श्रीलंकेतील घडामोडींवर एक विश्लेषण सामनाने छापले, असं स्पष्टीकरण 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दिलं आहे.
मुंबई : बुरखाबंदीच्या अग्रलेखावरुन 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माघार घेतली आहे. बुरखाबंदीची मागणी शिवसेना किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाही, तर एक विश्लेषण असल्याचं स्पष्टीकरण 'रोखठोक' मधून संजय राऊत यांनी दिलं आहे.
'बुरखाबंदीची जितकी चर्चा श्रीलंकेत झाली नाही, त्यापेक्षा जास्त चर्चा आपल्या देशात झाली. एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, बुरखाबंदीची मागणी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी केली नाही. श्रीलंकेतील घडामोडींवर एक विश्लेषण सामनाने छापले इतकाच हा विषय' असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं आहे.
'सामना'च्या अग्रलेखातून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बुरखा आणि नकाबबंदीची मागणी केल्यानंतर मोठी चर्चा झाली होती. मात्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी सांगितल्यामुळे पक्षात दोन तट पडल्याचं चित्र दिसलं.
VIDEO | बुरखाबंदीवरुन संजय राऊत पुन्हा एकदा तोंडघशी, सामनातून बुरखाबंदीची मागणी | एबीपी माझा
शिवसेना पक्षाच्या भूमिका नेत्यांच्या बैठकीतून ठरत असतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्या अंतिमत: ठरतात. आजच्या सामनाच्या अग्रलेखातील भूमिका ना चर्चेतून आली, ना आदेशातून आली आहे. त्यामुळे कदाचित हे चालू घडामोडींवर वैयक्तिक मत असेल शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असं निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं होतं.
त्यानंतर, बुरखाबंदीची मागणी शिवसेनेची नाहीच. श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यानंतरची ती परखड भूमिका आहे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हीच भूमिका ठामपणे घेतली आहे. श्रीलंकेतील दहशतवादी हल्ला व तेथील सरकारने घेतलेल्या भूमिकेचा हे विश्लेषण आहे, असं ट्वीट करत संजय राऊतांनी आपली भूमिका मांडली होती.
महिला नेत्यांनी मुस्लिम महिलांचे दुःख समजून घ्यावे. तिहेरी तलाकला विरोध आणि बुरखा बंदी नको. याचं समर्थन महिला नेत्यांनी तरी करु नये, असं 'रोखठोक' प्रत्युत्तर संजय राऊतांनी निलम गोऱ्हे यांना दिलं होतं. श्रीलंकेतील साखळी स्फोटांनंतर राष्ट्रपती मैत्रीपाल यांनी घेतलेल्या बुरखाबंदीच्या निर्णयाची री शिवसेनेने ओढली होती. 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने श्रीलंकेप्रमाणेच भारतातही बुरखा आणि नकाबबंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. मोदी अयोध्या दौऱ्यावर असल्याने रावणाच्या लंकेत जे घडलं ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवालही शिवसेनेने पंतप्रधान मोदींना केला.बुरखा बंदीचया अग्रलेखाने ओवेसी यांनी इतके लाल हिरवे का व्हावे? शिवसेनाप्रमुख हीच भुमिका ठामपणे मांडत होते. श्रीलंकेतील दहशतवादी हल्ला व तेथील सरकारने घेतलेल्या भूमिकेचा हे विश्लेषण आहे. या भूमिकेत नवीन काय आहे? महिला नेत्यांनी मुस्लीम महिलांचे दुःख समजून घ्यावे
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 1, 2019
संबंधित बातम्या
रावणाच्या लंकेत जे घडलं ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, बुरखा बंदीवरुन शिवसेनेचा मोदींना सवाल
मोदींना हरवण्याची भाषा करणाऱ्या पोपट मास्तरांची कोलांटउडी, ओवेसींचा शिवसेनेवर बोचरा वार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement