आयएनएस विक्रांतचा घोटाळा बोफर्सपेक्षा मोठा, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : इमोशनल ब्लॅकमेल करत किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या माध्यमातून पैसे लाटले आहेत. यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे.
Sanjay Raut : इमोशनल ब्लॅकमेल करत किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या माध्यमातून पैसे लाटले आहेत. यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. आयएनएस विक्रांतचा घोटाळा हा बोफर्स घोटाळ्यापेक्षा मोठा आहे. माझ्यासारख्या माणसाला संसदेत बोलू दिले जात नाही. परंतु आज शरद पवारांनी राष्ट्रहीताची भूमिका पंतप्रधानांसमोर मांडली. देशाच्या स्वातंत्र्यांचा नवा आध्याय सुरु झाला आहे. माझ्यावरील कारवाईनंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
शरद पवार यांचा आभारी -
प्रश्न संजय राऊत यांचा नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या मागे चुकीच्या कारवाया केल्या जात आहेत. या सर्व कारवाया राजकीय दबावाखाली सुरु आहेत. आणि शरद पवार यांनी माझ्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भूमिका मांडली. शरद पवार यांचा आभारी आहे, त्यांनी पंतप्रधानांसमोर भूमिका मांडली. केंद्रीय तपास यंत्रणाच्या चुकीच्या कारवायांवर मोदींचं लक्ष वेधलं. तसेच महाराष्ट्रामध्ये केंद्रीय तपास यंत्रणाचा सैराचार सुरु आहे, याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी दिली, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील तपास यंत्रणाच्या कारवायामध्ये काही फरक पडेल का, असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, काही फरक पडला नाही, तरीही आम्ही घाबरणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडी ने केलेल्या कारवाईचा निषेध -
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडी ने केलेल्या कारवाईचा निषेध महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केला आहे. राऊत यांच्यावरील कारवाई त्वरित थांबवावी अशी मागणी राष्ट्रपतींच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिले .केंद्र सरकार तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे .जाणून बुजून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कडून त्रास दिला जात आहे.केंद्रीय तपास यंत्रणांच्या चा दुरुपयोग करणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नव्हे.खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाई असो किंवा महाराष्ट्रातील सरकार डळ मळीत करण्याचा प्रयत्न असो असे प्रकार ताबडतोब थांबवले पाहिजेत.माननीय राष्ट्रपतींनी यामध्ये लक्ष घालून केंद्रीय यंत्रणांकडून दिला जाणारा त्रास थांबवावा अशी मागणी करण्यात आली आहे.