एक्स्प्लोर

Bhavana Gawali on ED Action : भाजपने जुलमी सत्र सुरु केलंय, खासदार भावना गवळी यांचा हल्लाबोल

मी पाच वेळा खासदार असल्याने हे काहींना सहन होत नाही. केंद्राकडून फक्त शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे, असं भावना गवळी यांनी म्हटलं आहे. 

वाशिम : यवतमाळ-वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीने छापेमारी केली. या कारवाई नंतर खासदार भावना गवळी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपने जुलमी सत्र सुरु केलं आहे, आणीबाणी सुरु आहे, असं भावना गवळी यांनी म्हटलं आहे. 

मला ईडीची नोटीस आलेली नाही. माझ्या संस्थेची ईडीकडून तपासणी सुरु आहे. मी पाच वेळा खासदार असल्याने हे काहींना सहन होत नाही. केंद्राकडून फक्त शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे, असं भावना गवळी यांनी म्हटलं आहे. 

भाजपने जुलमी सत्र सुरू केलं आहे. माझी आणि माझ्या संस्थांची काय चौकशी करायची ती करा. पण शिवसेना या अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे. आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही. माझी चौकशी करताय तर वाशिम जिल्ह्यातील भाजपचे आमदार यांची पण चौकशी करा, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी केली आहे.

खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. त्याआधी भाजपनं भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या.

एकेकाळी भावना गवळींच्या वडिलांचा सोबती असलेले शिवसैनिक हरीश सारडाने यांनी भावना गवळींची ईडीला तक्रार केली आहे. त्यानंतर हे प्रकरण भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरले. एवढेच नाही तर सोमय्यांनी वाशीमला येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यांच्याविरोधात 100 एकर जमीन असलेल्या बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्याबाबतच्या एकूण खरेदी-विक्री व्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली आहे.    

भावना गवळींवर काय आहेत आरोप?

  • 1992 ला पणन संचालकांकडे श्री बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखाना मर्यादित पुंडलिकनगर रजिस्टर झाला. ज्याचे अध्यक्ष भावना गवळींचे वडील पुंडलिकराव होते. 
  • राष्ट्रीय सहकार निगम ने कारखान्याला रुपये 43.35 कोटी निधी दिला. ज्याचे हमीपत्र राज्य शासनाचे होते.   
  • 2001  पर्यंत कारखाना सुरु केला नाही, पण मशीन, बिल्डिंग सगळी उभी झाली.  
  • 2001  ला स्वतःची मुलगी खासदार भावना गवळी अध्यक्ष असलेल्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानाला शासनाची परवानगी न घेता आणि निविदा न काढता सहकारी कारखान्याची 14 हेक्टर जमीन विकत दिली. 
  • 2001 ला खासदार भावना गवळी कारखान्याच्या अध्यक्ष झाल्या. 
  • 2007  मध्ये तत्कालीन पणन संचालक, पणन मंत्री आणि वित्त मंत्री ह्यांनी कारखाना अवसनात काढण्याची परवानगी दिली. 
  • परवानगी मजेशीर होती असा आरोप, ज्या अध्यक्षाने म्हणजे भावना गवळी यांनी कारखाना बुडवल्याचा आरोप आहे त्यांनाच  LIQUIDATOR नेमले. 
  • अवसायक मंडळावर असणारे इतर सदस्य - भावना गवळींच्या आई शालिनीताई  आणि त्यांच्याच संस्थेचा सदस्य मदन रामजी काळे आणि नातेवाईक श्यामराव जाधव यांनी कारखाना विकायची परवानगी मागितली. पण प्रस्ताव पाठवताना 22/8/2008 ला वाशीमचे जिल्हा उपनिबंधक यांनी ज्या अटीशर्ती टाकल्या होत्या त्या पाळल्या नाहीत.
  • तिसऱ्यांदा जाहिरात काढली, जुलै २०१० ला  तालुका स्तराच्या वर्तमानपत्रात. टेंडर मंजूर केले 
  • टेंडर मिळालेल्या कपनीचे नाव - भावना ऍग्रो प्रॉडक्ट्स अँड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड - अशोक गांडोळे यांचे 90% शेयर्स जे भावना गवळींचे अधिकृत पीए आहेत
  • निविदा मंजूर केलेल्या कंपनीचे पैसे नाहीत 
  • मग शासनाची परवानगी न घेता तत्कालीन पणन संचालक ह्यांनी बँक गॅरंटीवर कारखाना विकण्याची परवानगी दिली
  • परत टेंडर काढायला पाहिजे होते, ते ही केले नाही 
  • 16  ऑगस्ट 2010 ला निविदा न काढता पीए असणाऱ्या गांडोळेला कारखाना विकला
  • बँक गॅरंटीची अट होती ज्यात द रिसोड अर्बन कोपराटीव्ह क्रेडिट सोसायटी यांची रुपये 6.84 कोटी बँक गॅरंटी घेतली   
  • ज्या क्रेडिट सोसायटीने हि बँक गॅरंटी दिली त्या पत संस्थेच्या अध्यक्ष ही भावना गवळीच 
  • बँक गॅरंटी देताना रिसोड अर्बन क्रेडिट सोसायटीने काहीच मॉर्गेज घेतले नाही 

हे पैसे शासनाकडे भरण्याची जवाबदारी LIQUIDATOR बोर्डाकडे होती, ते पैसे अजून ही भरलेले नाही . न ते पैशे पतसंस्थेने भरले 

जो सहकारी कारखाना होता तो अश्या पद्धतीने पीएशी संगनमत करून गिळंकृत केल्याचा आरोप 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Guess Who: लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Embed widget