एक्स्प्लोर
लोकांनी आमदारांचे कपडे काढायचं बाकी राहिलंय, सेनेचे आमदार मंत्र्यांवर वैतागले !
मुंबई : शिवसेनेचे ग्रामीण भागातील आमदार स्वत:च्याच मंत्र्यांवर प्रचंड वैतागले आहेत. मंत्र्यांच्या धरसोड भूमिकेवरुन शिवसेना आमदारांनी मंत्र्यांना झापल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चुकीची माहिती देत असल्याचा आमदारांनी मंत्र्यांवर ठपका ठेवला.
मतदारसंघात फिरताना लोकांनी आमदारांचे कपडे काढण्याचे बाकी राहिले आहे, अशी खंत व्यक्त करत शिवसेनेच्या आमदारांनी मंत्र्यांवर एकप्रकारे संताप व्यक्त केला आहे.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी दिल्लीवारी केली होती. मात्र, आता यावरुन शिवसेनेच्या आमदारांनी मंत्र्यांना धारेवर धरलं आहे. दिल्लीवारी अपयशी ठरल्याचा शिवसेना आमदारांनी मंत्र्यांना जाब विचारला. मात्र, आजच्या बैठतीत शिवसेनेचे मंत्री निरुत्तर झाले.
राज्याचा अर्थसंकल्प मांडू देऊन पुन्हा निलंबनाला विरोध करण्याचे आदेश दिल्याने आमदारांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. ग्रामीण भागातील आमदारांची अब्रू गेल्याची आमदारांची भावना आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement