एक्स्प्लोर

आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरु? शिवसेना आमदार म्हणतात...

आमदार फोडण्याच्या राजकारणाविषयी 'एबीपी माझा'ने शिवसेनेच्या दोन आमदारांकडे विचारणा केली, त्यावर शिवसेना आमदारांनी सांगितले की, आमदार फुटण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत.

मुंबई : काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, राज्यात सत्ताधारी लोक इतर पक्षाचे आमदार फोडण्याच्या प्रयत्नात आहेत. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आमदार फोडण्याच्या राजकारणाविषयी 'एबीपी माझा'ने शिवसेनेच्या दोन आमदारांकडे विचारणा केली, त्यावर शिवसेना आमदारांनी सांगितले की, आमदार फुटण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. शिवसेनेचे राधानगरी मतदारसंघातील आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, आमदार फुटण्याचे दिवस संपले आहेत. पूर्वीच्या राजकारणात अशा गोष्टी व्हायच्या. जनता आमच्यापेक्षा हुशार आहेत. पूर्वीच्या काळात आमदार फुटायचे, एखाद्या मोहाला बळी पडायचे. परंतु आता मतदार अशा गोष्टींना थारा देत नाहीत. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची गोष्ट केलेली त्यांना मान्य नाही. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, काल मातोश्रीचा निरोप आल्यानंतर आम्ही सर्व आमदार आज मुंबईत दाखल झालो आहोत. थोड्याच वेळात आमची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षप्रमुख सत्तास्थापनेबाबत त्यांचे विचार मांडतील. शिवसेनेचा आमदार मुख्यमंत्री व्हावा ही आमची इच्छा आहेच, परंतु उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लवकर व्हायला हवा. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात 'मातोश्री'वर शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांचा नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडंट येथे मुक्काम असणार आहे. कोणत्याही पक्षाचे नेते या आमदारांशी संपर्क करु शकणार नाहीत, याची काळजी शिवसेनेने घेतली आहे. एकही आमदार फुटू नये यासाठी शिवसेनेने हा खबरदारीचा उपाय योजला आहे. पाहा काय म्हणाले शिवसेना आमदार? आमदार फोडण्याच्या राजकारणावर काय म्हणाले संजय राऊत? आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरु, परंतु कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही : संजय राऊत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Embed widget