एक्स्प्लोर
शिवसेना आमदाराची निवेदकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

सोलापूर : महाराष्ट्र दिनानिमित्त तहसिल कार्यालयात आयोजीत ध्वजारोहण समारंभात शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी आक्षेपार्ह विधान करून वाद ओढून घेतला. कुकडी प्रकल्पातील पाण्याचं उन्हाळ्यातील आवर्तन करमाळा तालुक्यास मिळावं, या मागणीसाठी आलेल्या लोकांना पाटील यांनी खालच्या भाषेत बोलल्याने उत्तर दिल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. नारायण पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल आणि मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली आमदार पाटील यांना पाणी प्रश्नाच निवेदन देण्यात येत होतं. नारायण पाटील यांनी पाणी मागणाऱ्या लोकांबद्दल शिवराळ भाषा वापरली. आमदारांची भाषा ऐकून शिष्ट मंडळातल्या एक-दोघांनीसुद्धा आमदारांना एकेरी भाषा वापरली. वाद वाढत जाऊन एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रकार घडला. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून आमदारांना दूर नेलं. याप्रकरणी पाटील यांच्याविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात अदखलपाञ गुन्हा दाखल झाला आहे. ध्वजारोहण झाल्यानंतर करमाळा तहसिल कार्यालयाच्या वेशीसमोर रश्मी बागल, दिग्विजय बागल यांच्यासह शेतकऱ्यांनी घेराव घालत कुकडीच्या अवर्तनाचा जाब विचारला. यावेळी नारायण पाटील यांनी निवेदन घेऊन तुम्ही कारखान्याचे काय केले? असा सवाल केला असता पाटील आणि रश्मी बागल-कोलते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. बागल समर्थकांनी नारायण पाटील यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. यावेळी पाटील यांनी चिडून अर्वाच्य भाषा वापरली. पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा























