एक्स्प्लोर
'हा' सुविचार लिहिणारा मोदीवाला माणूस : दिवाकर रावते
'व्यसनाचा करु धिक्कार, जगवण्याचा करु आधार' असं लिहायला हवं होतं. दारु सोडणारा विकास कसा करणार? हा तर मोदीवाला माणूस दिसतो, अशी उपरोधिक टिपण्णी शिवसेना मंत्री दिवाकर रावतेंनी केली.

पिंपरी चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडताना दिसत नाही. याची प्रचिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा आली. विकासावर आधारित लिहिलेला सुविचार पाहून, 'लिहिणारा मोदींचा माणूस दिसतो' अशी उपरोधिक टीका रावतेंनी केली.
वल्लभनगर एसटी आगारातील नूतनीकृत विश्रामगृहाचे उद्घाटन करुन रावते इमारतीची पाहणी करत होते. तेव्हा भिंतीवर, "व्यसनाचा करु धिक्कार, विकास योजनांना लावू हातभार" असा सुविचार लिहिलेला त्यांना दिसला.
'व्यसनाचा करु धिक्कार, जगवण्याचा करु आधार' असं लिहायला हवं होतं, असं रावतेंनी सांगितलं. 'आपल्याकडे बारा जणांचा जीव घेतलेल्या त्या संतोष मानेला वेडा ठरवल्याने त्याची फाशी रद्द झाली.' असं रावतेंनी सूचित केलं. 'त्यामुळे दारु सोडणारा विकास कसा करणार? हा तर मोदीवाला माणूस दिसतो, अशी उपरोधिक टिपण्णी रावतेंनी केली.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
जालना
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















