एक्स्प्लोर

रिफायनरीबाबत शिवसेनेची अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही, रिफायनरी विरोधकांना विनायक राऊतांची माहिती

मुंबईमध्ये रिफायनरी विरोधकांनी खासदार विनायक राऊत यांची भेट घेत त्यांना रिफायनरीला विरोध असणारं जवळपास 5 हजार सह्याचं निवेदन दिलं.

रत्नागिरी : कोकणात अर्थात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाची चर्चा मागील चार ते सहा महिन्यापासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. प्रकल्प होणार की हद्दपार होणार? प्रकल्पाला विरोध किती? समर्थन किती? याबाबत देखील चर्चा, शक्ती प्रदर्शन सुरू आहे. दोन्ही बाजूने संघटना स्थापन करत आपली भूमिका स्पष्ट केली जात आहे. दरम्यान, याच मुद्यावरून मुंबईतील आणि गावातील रिफायनरी विरोधकांनी शिवसेना खासदार आणि सचिव विनायक राऊत यांची मुंबईमध्ये भेट घेतली. यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत यांनी 'रिफायनरीबाबत शिवसेनेची कोणतीही अधिकृत भूमिका नाही' असं भेटीदरम्यान म्हटलं आहे. कारण काहीच दिवसांपूर्वी प्रकल्प समर्थकांनी राजापूर येथे खासदार यांची भेट घेत प्रकल्प व्हावा यासाठी भेट घेतली होती. त्यावेळी खासदार राऊत यांनी तुमचं म्हणणं मी पक्षनेतृत्व अर्थात उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवेन असं म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा रिफायनरी विरोधकांनी देखील भेट घेत विरोध स्पष्ट केला आहे. याच मुद्यावर खासदार विनायक राऊत उद्धव ठाकरे यांची भेट घेत घडामोडी आणि समर्थक, विरोधक यांनी दिलेली निवेदनं देणार आहेत. 

भेटीदरम्यान काय झालं? शिवसेनेची भूमिका काय?

सध्या शिवसेना ना विरोधात आहे ना बाजूने अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरी विरोधकांना दिली आहे. मुंबईमध्ये रिफायनरी विरोधकांनी खासदार विनायक राऊत यांची भेट घेत त्यांना रिफायनरीला विरोध असणारं जवळपास 5 हजार सह्याचं निवेदन दिलं. यावेळी त्यांनी आपलं म्हणणं खासदार राऊत यांच्या कानावर देखील घातलं. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी तुमचं म्हणणं मी वरिष्ठ नेतृत्व अर्थात पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवेन अशी ग्वाही भेटीदरम्यान विरोधकांना दिली आहे. या भेटीकरता मुंबई तसेच गावातील काही रिफायनरी प्रकल्प विरोधक राऊत यांच्या भेटीसाठी गेले होते. दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहता आम्ही स्थानिकांसोबत आहोत. जर स्थानिकांना प्रकल्प हवा असेल तर आम्ही प्रकल्पाचा बाजूनं आणि जर स्थानिकांना प्रकल्प नको असेल तर आम्ही प्रकल्पाच्या विरोधात अशी सध्या शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे एकंदरीत सारी परिस्थिती पाहता शिवसेनेनं कोणताही अधिकृत अर्थात हो किंवा नाही अशी कोणताही भूमिका घेतलेली नाही. 

भेटीनंतर विनायक राऊत यांचं म्हणणं काय?

रिफायनरी प्रकल्प विरोधक आणि त्यांची भेट याबाबतची माहिती मिळाल्यानंतर 'एबीपी माझा'नं खासदार विनायक राऊत यांच्याशी देखील संपर्क साधला. पण, साहेब सध्या मीटिंगमध्ये आहेत. तुमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवत कॉल करतो अशी प्रतिक्रिया त्यांच्या निकटवर्तीय किंवा पीए यांच्याकडून दिली गेली आहे. 

सध्या रिफायनरीची काय स्थिती?

शिवसेनेनं नाणार येथील प्रकल्पाची अधिसुचना रद्द केली हे सर्वांना ठावूक आहे. पण, त्यानंतर देखील राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगाव या एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेवर रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी चाचपणी सुरू आहे. त्याबाबत एमआयडीसी आणि उद्योग मंत्रालय देखील सकारात्मक असल्याची माहिती खात्रीलायल सुत्रांनी दिली आहे. पण, कंपनीला त्याबाबत कोणतंही अधिकृत पत्र दिलेलं नाही. सध्या केवळ चर्चा आणि चाचपणी यापलिकडे कोणत्याही घडामोडी दिसत नाही. 

नारायण राणेंचं समर्थन

जनआशीर्वाद यात्रेकरता केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणात आहेत. यावेळी त्यांनी रिफायनरी झाली पाहिजे असं विधान केलं आहे. त्यामुळे राणेंच्या विधानामुळे तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आलं आहे. पण, आमचा विरोध ठाम आहे. जिल्ह्यात, तालुक्यातील लोकांना काय वाटतं? यापेक्षा स्थानिकांचं म्हणणं महत्त्वाचं आहे. जवळपास 95 टक्के लोक अद्यापही विरोधात आहेत असा दावा रिफायनरी प्रकल्प विरोधकांचा आहे. तर, रिफानरी समर्थकांचा आमच्याकडे 8500 एकर जमिनीची परवानगी असल्याचा दावा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget