आमचा स्ट्राईक रेट चांगला, त्यामुळं आम्ही मोठा भाऊ, संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यामुळं आम्ही मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलं आहे.
Sanjay Shirsat : आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यामुळं आम्ही मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलं आहे. ठाकरे यांनी लढवलेल्या जागा या 22 होत्या. आम्ही लढवलेल्या जागा या 15 आहेत. त्यामुळं आमचा स्ट्राईक रेट चांगलं असल्याचे शिरसाट म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे. तसेच अधिवेशना पूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार होईल असं मला वाटत असल्याचेही संजय शिरसाट म्हणाले.
दरम्यान, महाविकस आघाडीची बैठक आहे, मात्र, तिथे नाना पटोले उपस्थित राहणार नाहीत. लोकसभेनंतर काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. बेताल वक्तव्य करून हिणवत असेल तर आम्ही सोबत बसणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळं निकालाच्या दिवशी पेढे वाटणाऱ्या लोकांना चपराक आहे. दुसऱ्यांच्या घरात मुलगा झाल्याचा आनंद व्यक्त करण्याचा परिणाम यांना कळेल असेही शिरसाट म्हणाले.
न्याय द्यायचं काम सकरार करत आहे
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु होते तिथं मंत्री शंभुराज देसाई गेले होते. न्याय द्यायचं काम सकरार करत आहे. कुणबी प्रमाणपत्र विविध योजनासाठी लागू केली आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे काम केले जात असल्याचे शिरसाट म्हणाले.
सुनेत्रा पवारांना आमचा पाठिंबा असल्याने उपस्थित राहणे महत्त्वाचं नव्हतं
दरम्यान, यावेळी संजय शिरसाच यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुद्यावर विचारण्यात आले. त्यावेळी शिरसाट म्हणाले की, त्यांचं कुणालाही निमंत्रण नव्हतं. आमचा पाठिंबा असल्याने उपस्थित राहणे महत्त्वाचं नव्हतं असे शिरसाट म्हणाले.
काँग्रेस राष्ट्रवादीमुळे किती नुकसान होते हे ठाकरे गटानं बघावं
विश्वजीत कदम यांनी तोंडावर सांगितले तुम्ही तिकडचे वाघ असेल तर आम्ही इकडचे वाघ आहेत. संजय राऊतसारखे लोक बोलत होते. यांना आता कदम यांच्या चरणी लीन व्हावं लागत असल्याचे शिरसाट म्हणाले. ठाकरे गटाच्या लोकांची वेळ गेली नाही. काँग्रेस राष्ट्रवादीमुळे किती नुकसान होते ते बघावं असेही शिरसाट म्हणाले. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची वाद आणि मैत्री लोकांनी बाघितली आहे. यामुळं ते सिरियस घेत नाहीत. ते मैत्रीत भांडण आहे की खर भांडण आहे ते बघावं लागेल असेही शिरसाट म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: