(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : 'संभाजीनगर' संदर्भात लवकरच सरप्राईज मिळेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
औरंगाबादचे नामांतरण करण्याच्या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Sanjay Raut : सध्या औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर करण्याच्या मुद्यावरुन राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. संभाजीनगर संदर्भात नक्कीच लवकरच सरप्राईज मिळेल असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळंं आता संभाजीनगर संदर्भात नेमकं काय सरप्राईज मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात देखील राऊतांनी शिवसेनेची भूमिका मांडली. शिवसेना राज्यसभेच्या दोन जागा लढवणारच आहे आणि निवडून सुद्धा आणणार असल्याचे राऊत म्हणाले. आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी संभाजीनगर संदर्भात लवकरच सरप्राईज मिळेल असेही राऊत म्हणाले. औरंगाबदच्या नामांतरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील वक्तव्य केलं होतं.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
14 मे रोजी आयोजीत करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह आरएसएसवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी औरंगाबदच्या नामांतरणा संदर्भात देखील वक्तव्य केलं होतं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की, 'मी संभाजीनगर म्हणतोच, नामांतरण करण्याची काय गरज, ते आहेच संभाजीनगर' असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते. यावेळी बोलताना त्यांनी ओवेसी यांच्यावर देखील टिका केली होती. उद्धव ठाकरे यांनी औरंगाबदच्या नामांतरणा संदर्भात केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
औरंगाबदच्या नामांतरणा संदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात टीका केली होती. 'त्या दिवशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, संभाजीनगरचे नामांतरण झाले काय आणि नाही झाले काय, मी बोलतोय ना, अरे तुम्ही कोण'? असा टोला राज यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता. मी बोलतोय याला काय लॉजीक आहे' असे राज म्हणाले. इतके वर्ष केंद्रात सत्ता होती आजपर्यंत कधी नामांतरणाचा प्रश्न मिटवला? असा सवाल राज यांनी केला. निवडणुकांसाठी हा प्रश्न सतत जीवंत ठेवायचा असून त्याच्यातून मते मिळवायची असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: