(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही, तसं केलं तर....संजय राऊतांचा इशारा
हे सरकार जर मोर्चाला परवानगी नाकारणार असेल तर सत्तेवर महाराष्ट्रद्रोही सरकार बसलंय असं म्हणाणं लागेल असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं.
Sanjay Raut : मुंबईत (Mumbai) निघणारा मोर्चा हा महाराष्ट्रप्रेमींचा आहे. राज्यातील विरोधी पक्षांचा (Opposition Parties) हा मोर्चा नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. हे सरकार जर मोर्चाला परवानगी नाकारणार असेल तर सत्तेवर महाराष्ट्रद्रोही सरकार बसलंय असं म्हणाणं लागेल असेही ते म्हणाले. ते सकाळी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही. परवानगी नाकारली तर त्याचे फार मोठे परिणाम महाराष्ट्राच्या जनतेत उमटतील असा इशाराही राऊतांनी सरकारला दिला.
उद्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह समविचारी पक्षांचा मुंबईत मोर्चा निघणार आहे. अद्याप या मोर्चाला सरकारकडून परवानगी मिळाली नाही. याबाबत संजय राऊत बोलत होते. मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही असे राऊत म्हणाले. खरतर सरकारमधील लोकांनी मोर्चात सामील होणं गरजेचं असल्याचे राऊत म्हणाले. एकीकडे महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान सुरु आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सीमाप्रश्नाबाबत फुरफुरत आहेत. राज्यातील उद्योग बाहेर जातातेय. हा महाराष्ट्रावर खूप मोठा अन्याय असल्याचे संजय राऊत म्हणाले.
लोकशाही मार्गानं आम्ही तुम्हाला सत्तेवरुन खाली खेचू
एकीकडे महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान सुरु आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सीमाप्रश्नाबाबत फुरफुरत आहेत. राज्यातील उद्योग बाहेर जातातेय. हा महाराष्ट्रावर खूप मोठा अन्याय असल्याचे संजय राऊत म्हणाले. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात महाराष्ट्र प्रेमींचे मोर्चे निघाले होते. तशाप्रकारचा मोर्चा उद्या निघणार आहे. घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात सत्तेवर बसलं आहे. आम्ही कोणतंही काम घटनाबाह्य करत नाही. हे सरकार लोकशाही पद्धतीला विरोध करत असल्याचे राऊत म्हणाले. आम्ही लोकशाही मार्गाने चाललो आहोत. त्याच मार्गाने आम्ही तुम्हाला सत्तेवरुन खाली खेचू असेही राऊत यावेळी म्हणाले.
भाजपच्या लोकांनी अभ्यास करावा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म देशातच झाला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891 मध्ये महू आताचे मध्य प्रदेश या ठिकाणी झाला होता. तेव्हा मध्य प्रदेश नव्हते. भाषीक राज्य कधी निर्माण झाली याचा अभ्यास भाजपच्या लोकांनी करावा असे म्हणत संजय राऊतांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. भाजपच्या काही लोकांचे मेंदू हे किड्या मुंग्यांचे असल्याचे राऊत म्हणाले. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्यावेळी या देशात कोणतही राज्य नव्हते. त्यावेळी एकच मुंबई प्रांत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते, हे जर त्यांना माहित नसेल तर अजूनही त्यांच्या आंबेडकर यांच्याविषयी काय भावना आहेत हे सप्ष्ट होत असल्याचे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: