एक्स्प्लोर

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; नॉट रिचेबल एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये

Shivsena Leader Eknath Shinde : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.

Shivsena Leader Eknath Shinde : राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election 2022) आणि विधान परिषद (Vidhan Parishad Election 2022) निवडणुकांच्या घोषणेपासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही भाजपनं (BJP) आपली जादू दाखवत महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का दिला आहे. अशातच आता महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची (ShivSena) मतं फुटल्यानंतर आता शिवसेनेत फूट पडणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. कारणंही तसंच आहे, शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या गटातील आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडणार असल्याच्या शक्यतांनी जोर धरला आहे. 

शिवसेना नेते शिवसेनेला जोरदार धक्का देणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात होत आहे. अशातच नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.  एकनाथ शिंदे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये 'एबीपी माझा' पोहोचला आहे. कालच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि गट नॉट रिचेबल आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे, काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची मिळत आहे. एकनाथ शिंदे असलेल्या हॉटेलबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून या भूकंपाचं केंद्र गुजरात तर नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर आता शिवसेनेतच फुट पडतेय की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेतले प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे यांचा नाराज गट काल संध्याकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याचं कळतंय. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीलाच धक्का मिळण्याची शक्यता आहे. एबीपी माझाच्या प्रतिनिधीनंही काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल असल्याचं लक्षात आलं. वर्षा बंगल्यावर याची कुणकुण लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश दिले गेले. पण काही आमदार नॉट रिचेबल असल्याचं लक्षात आलं. शिवसेनेतील धुसफूस समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन चर्चा केली.

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; नॉट रिचेबल एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये

एकनाथ शिंदे घेणार टोकाची भूमिका?

गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती  आहे. रात्रीच्या सुमारास 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधींनी देखील काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही फोन नॉटरिचेबल लागला होता. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील 'वर्षा' या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मौन, महायुतीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
नाशिकच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मौन, महायुतीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
CM Eknath Shinde Meet Salman Khan : 'गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नाही'; सलमान खानच्या भेटीनंतर CM एकनाथ शिंदेचे आश्वासन
'गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नाही'; सलमान खानच्या भेटीनंतर CM एकनाथ शिंदेचे आश्वासन
Amit Deshmukh : ''भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे अन् अजित पवारांविरुद्धच''
''भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे अन् अजित पवारांविरुद्धच''
RCB साठी खरं बॅडलक.. जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा पराभव झाला, आतापर्यंत 5 सामने गमावले!
RCB साठी खरं बॅडलक.. जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा पराभव झाला, आतापर्यंत 5 सामने गमावले!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Shirsath Full PC : नवनीत राणांच्या मोदींबाबतच्या वक्तव्यावर संजय शिरसाट काय म्हणाले?Wari Loksabhechi 2024 Chandrapur EP 03 : वारी लोकसभेची चंद्रपुरात, कोण कुणाला धुळ चारणार?ABP Majha Headlines : 5 PM  :16 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSunanda Pawar:रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांनी घेतला पुरक उमेदवारी अर्ज,बारामती लोकसभेसाठी इच्छुक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मौन, महायुतीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
नाशिकच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मौन, महायुतीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
CM Eknath Shinde Meet Salman Khan : 'गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नाही'; सलमान खानच्या भेटीनंतर CM एकनाथ शिंदेचे आश्वासन
'गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नाही'; सलमान खानच्या भेटीनंतर CM एकनाथ शिंदेचे आश्वासन
Amit Deshmukh : ''भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे अन् अजित पवारांविरुद्धच''
''भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे अन् अजित पवारांविरुद्धच''
RCB साठी खरं बॅडलक.. जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा पराभव झाला, आतापर्यंत 5 सामने गमावले!
RCB साठी खरं बॅडलक.. जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा पराभव झाला, आतापर्यंत 5 सामने गमावले!
रावेरमध्ये शरद पवार गटाचा मोठा नेता बंडाच्या तयारीत, लोकसभा लढवण्यावर ठाम, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीखही सांगितली!
रावेरमध्ये शरद पवार गटाचा मोठा नेता बंडाच्या तयारीत, लोकसभा लढवण्यावर ठाम, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीखही सांगितली!
Telly Masala : आमिर खानची पोलिसात धाव, एफआयआर दाखल ते सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
आमिर खानची पोलिसात धाव, एफआयआर दाखल ते सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
हार्दिकच्या भविष्याचा निर्णय रोहितच्या हातात, मुंबईत द्रविड-आगरकरसोबत दोन तास चर्चा!
हार्दिकच्या भविष्याचा निर्णय रोहितच्या हातात, मुंबईत द्रविड-आगरकरसोबत दोन तास चर्चा!
Nashik Lok Sabha : 'नाशिकचा उमेदवार धनुष्यबाणाचाच असणार', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचं मोठं वक्तव्य
'नाशिकचा उमेदवार धनुष्यबाणाचाच असणार', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचं मोठं वक्तव्य
Embed widget