एक्स्प्लोर
Advertisement
रात्रीच खेळ चालणार? भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात महाविकासआघाडीची सुप्रीम कोर्टात याचिका
भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज रात्रीच सुनावणी घेतली जावी, यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांचे वकील प्रयत्न करत आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून हाय व्होल्टेज ड्रामा सुरु आहे. हा ड्रामा सुरु असताना आज राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. कोणालाही कल्पना नसताना आज सकाळी भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे गुपचूप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतरही राज्यातील सत्तासंघर्षाचा ड्रामा संपलेला नाही. कारण भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज रात्रीच सुनावणी घेतली जावी, यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांचे वकील प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आज रात्रीदेखील हाय व्होल्टेज ड्रामा सुरु राहील, असे बोलले जात आहे.
महाविकासआघाडीने भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर आज रात्रीच यावर सुनावणी घेतली जावी, यासाठी पक्षांचे वकील निबंधकांच्या (रजिस्ट्रार ) कार्यालयात पोहोचले आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षांची ही मागणी जर मान्य झाली तर आज रात्री पुन्हा लेट नाईट ड्रामा पाहायला मिळेल.
राज्यापालांनी घेतलेला सरकार स्थापनेचा निर्णय हा बेकायदेशीर आहे. हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी तिन्ही पक्षांनी मांडली आहे. तसेच विधानसभेचं अधिवेशन तातडीने बोलावण्यात यावं, असेही या पक्षांचे म्हणणे आहे.
तिन्ही पक्षांनी याचिकेद्वारे मागणी केली आहे की, उद्याच विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात यावे. त्यानंतर बहुमताची जी प्रक्रिया यावेळी पार पडेल, त्याचे चित्रीकरण केले जावे, जेणेकरण कोर्टासमोर सर्व पुरावे उपलब्ध होतील. जर या पक्षांची मागणी मान्य झाली तर आज रात्री याप्रकरणावर सुनावणी होईल. याप्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तिन्ही पक्षांची बाजू मांडतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
व्हिडीओ पाहा : कालपासून बेपत्ता असलेले धनंजय मुंडे परतले
"पवार कुटुंबात उभी फूट", पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी | ABP Majha
बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया कशी पार पडेल? माजी विधीमंडळ सचिव अनंत कळसेंचं विश्लेषण
'त्या' निर्णयात शरद पवारही सामील; नवनीत कौर राणांचा आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement