एक्स्प्लोर
सेना-भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही : गडकरी

नागपूर: मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय दिसत नाही, असं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं. ते एबीपी माझाशी बोलत होते.
गडकरी म्हणाले, "शिवसेनेसोबतची युती ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. निवडणुकीच्या काळात मतभेद झाले असले तरी ते तितके टोकाचे नाहीत. जे झालं ते विसरुन मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय नाही. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचाराने निर्णय घ्यावा"
महापौर कुणाचा?
शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर महापौर कुणाचा असा प्रश्नही गडकरींना विचारण्यात आला. त्यावर गडकरी म्हणाले, "प्रत्येकालाच आपला महापौर असावा असं वाटतं. मात्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघेही मॅच्युअर आहेत, ते योग्य निर्णय घेतील. कारण शिवसेना आणि भाजपची युती ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन झाली आहे. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक मतभेद नाहीत"
सामनाची भूमिका अयोग्य
दुसरीकडे शिवसेना हा मित्रपक्ष असला तरी सामनातील भूमिका योग्य नसल्याचं गडकरी म्हणाले.
भाजप आणि शिवसेना हे वेगळे पक्ष आहेत. दोघांना आप-आपली मतं आहेत. मात्र मित्रपक्षाबाबत सातत्याने अपमानित होणारं लिखाण 'सामना'तून छापणं योग्य नाही. पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांबाबत सातत्याने आक्षेपार्ह लिखाण केलं जातं, ते थांबायला हवं, असं गडकरी म्हणाले.
मुंबईतील बिग फाईट्स, कोण हरलं, कोण जिंकलं?
तसंच भाजपने सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर विजय मिळवला हा शिवसेना आणि 'सामना'चा आरोप चुकीचा असल्याचंही गडकरींनी नमूद केलं.
निकाल काहीही असला तरी तो खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा, असाही सल्ला त्यांनी दिला. शिवसेना-भाजपमध्ये दरी निर्माण होण्यासाठी सामनाच जबाबदार आहे. त्यामुळे मैत्री ठेवायची असेल तर जबाबदारीने लिहावं लागेल. पंतप्रधान, आणि भाजप अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह लिहिणं टाळावं, असं गडकरी म्हणाले. संबंधित बातम्यापक्षनिहाय निकाल : 10 महापालिकांमध्ये कुठे कुणाला बहुमत?
BMC election result : मुंबई विजयी उमेदवारांची यादी
जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल!
मुंबईत कुणाचा महापौर बसणार? सत्तेची समीकरणं
मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली!
ईश्वर चिठ्ठी भाजपच्या बाजूने, मुंबईत एक जागा वाढली
मुंबईत ‘या’ दिग्गजांना मतदारांचा दे धक्का
ठाण्यात पत्नीवर नारळ भिरकावणारे शिवसेना उमेदवार विजयी
मत देतो, पण झोपेची वेळ नका घेऊ, सदाशिव पेठेत भाजपला यश
आता कटुता पुरे झाली, सेना-भाजपने एकत्र यावं : चंद्रकांत पाटील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
