एक्स्प्लोर

भंडाऱ्याच्या शिवसेना जिल्हा प्रमुखाचा भाजपात प्रवेश

भंडाऱ्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी पदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

भंडारा : लोकसभा पोटनिवडणुकीच्या अगोदर शिवसेनेला भंडाऱ्यात मोठा धक्का बसला आहे. भंडाऱ्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी पदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. नागपुरात राजेंद्र पटले यांनी भाजपात प्रवेश करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेने या निवडणुकीसाठी राजेंद्र पटले यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी नाराज होत भाजपात प्रवेश केला. दरम्यान, भाजपला भंडाऱ्यात पुन्हा पोवार समाजाचा नेता मिळाल्यामुळे आगामी निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार आहे. विशेषतः भाजपला राजेंद्र पटले यांचा तुमसर विधानसभा मतदारसंघात फायदा होईल. शिवाय या लोकसभा पोटनिवडणुकीतही ते भाजपला मदत करणार आहेत. कोण आहेत राजेंद्र पटले? राजेंद्र पटले हे शिवसेनेचे भंडाऱ्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत. त्याअगोदर ते किसान गर्जना संघटनेचे अध्यक्ष होते. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक आंदोलनं केली. शिवसेनेत येण्याअगोदर पटले भाजपातच होते. मात्र 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली. शिवसेनेकडून त्यांनी तुमसरमधून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र भाजपच्या चरण वाघमारे यांनी पटले यांचा पराभव केला. त्यानंतर शिवसेनेत ते भंडाऱ्याचे जिल्हाध्यक्ष होते. पण पोटनिवडणुकीअगोदर त्यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला आहे. राज्यात तीन ठिकाणी पोटनिवडणूक पालघरमधील भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. तसंच भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या दोन्ही मतदारसंघात 28 मे रोजी पोटनिवड घेण्यात येणार आहे. तसंच पतंगराव कदमांच्या निधनामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभेची जागाही रिक्त झाली आहे. या जागेसाठीही 28 मे रोजी मतदान होणार आहे, तर 31 मे रोजी मतमोजणी होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Embed widget