एक्स्प्लोर

विनायक मेटेंना दणका; बीडमधील शिवसंग्रामचा एकमेव जिल्हा परिषद सदस्य भाजपमध्ये

भाजपाचा सहयोगी पक्ष म्हणून घेणाऱ्या विनायक मेटे यांना मात्र बीडच्या भाजपशी जुळवून घेता आलेलं नाही. यामुळे इतर सहयोगी पक्षांना किमान एक मंत्रीपद मिळालं होतं मात्र विनायक मेटेंना मंत्रीपद मिळालं नाही.

बीड : शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे बीडच्या भाजपशी असलेले वैर त्यांच्या चांगलेच अंगलट येताना पाहायला मिळत आहे. विनायक मेंटेच्या शिवसंग्रामचे एकूण चार जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. आज त्या शिवसंग्रामकडे एकही जिल्हा परिषद सदस्य राहिलेला नाही. शिवसंग्रामचे एकुलते एक जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनीही पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपचा सहयोगी पक्ष असलेला शिवसंग्राम बीड जिल्ह्यात मात्र भाजपविरोधी म्हणून ओळखला जातो. अगदी काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्रामने भाजपविरोधी भूमिका घेतली होती. विशेष म्हणजे तिकडे राज्यभर भाजपाचा सहयोगी पक्ष म्हणून घेणाऱ्या विनायक मेटे यांना मात्र बीडच्या भाजपशी जुळवून घेता आलेलं नाही. यामुळे इतर सहयोगी पक्षांना किमान एक मंत्रीपद मिळालं होतं मात्र विनायक मेटेंना मंत्रीपद मिळालं नाही.

भाजपच्या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांचा सत्कार स्वीकारल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक नाराज झाल्याचे चित्र समोर आलं होतं. एवढेच नाही तर या रथामध्ये विनायक मेटे मुख्यमंत्र्यांसमवेत भाषण करत होते, तर त्याच रथातून पंकजा मुंडे या उतरुन आपल्या स्वतःच्या गाडीतून सभास्थळी गेल्या होत्या.

शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के गळाला लागल्यानंतर यापूर्वीच शिवसंग्रामचे दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपने आपल्या गोटात घेतले होते. आज पंकजा मुंडे यांच्या रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी शिवसंग्रामचे एकमेव जिल्हा परिषद सदस्य देखील आज भाजपवासी झाले.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्रामने भाजपकडून 12 जागा मागितल्या होत्या. मात्र ज्या शिवसंग्रामकडे आज बीड जिल्ह्यात एकही जिल्हा परिषद सदस्य शिल्लक राहिला नाही, त्या शिवसंग्रामला भाजप किती जागा देते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मंत्री अदिती तटकरेंच्या खासगी सचिवाकडून महिला अधिकाऱ्यांना धमक्या अन् बदल्यांच्या रॅकेटचा आरोप, रोहिणी खडसेंचा संतप्त सवाल; म्हणाल्या आर्थिक लागेबांधे अन्..
मंत्री अदिती तटकरेंच्या खासगी सचिवाकडून महिला अधिकाऱ्यांना धमक्या अन् बदल्यांच्या रॅकेटचा आरोप, रोहिणी खडसेंचा संतप्त सवाल; म्हणाल्या आर्थिक लागेबांधे अन्..
Vidhan Parishad Election 2026 : शिवसेनेकडून राजन साळवी कोकण विधानपरिषदेच्या मैदानात? साळवींच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले...
शिवसेनेकडून राजन साळवी कोकण विधानपरिषदेच्या मैदानात? साळवींच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले...
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
Maharashtra Live blog updates: राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईच्या नरिमन पॉईंटमधील एअर इंडियाची इमारत 1600 कोटींना विकत घेणार
Maharashtra Live blog updates: राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईच्या नरिमन पॉईंटमधील एअर इंडियाची इमारत 1600 कोटींना विकत घेणार

व्हिडीओ

Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
IPL Playoffs: आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?
आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?
Devendra Fadnavis on Petrol Diesel: देशात तिसऱ्यांदा पेट्रोलचे भाव वाढले, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, देवेंद्र फडणवीसांचा जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश
पेट्रोल-डिझेलची भाववाढ, शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, फडणवीसांनी ती गोष्ट हेरली, म्हणाले, काहीतरी गडबड
सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल
Crime News: नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
Embed widget