एक्स्प्लोर
अवघा रायगड शिवमय झाला, किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

रायगड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 342वा शिवराज्याभिषेक दिन आहे. यानिमित्त किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहं. शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहाळ्यासाठी हजारो शिवभक्त गेल्या दोन दिवसांपासून रायगडावर दाखल झाले आहेत.
कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्याभिषेकाचा सोहाळा साजरा होणार असून यासाठी शुक्रवारीच कोल्हापूर हायकर्सची एक तुकडी जलकुंभासह गडावर दाखल झाली. तर शिवधनुष्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शिवनेरीहून पालखी घेऊन गडावर दाखल झाले आहेत.
शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने सोहळ्यानिमित्त मेघडंबरीतील शिवछत्रपतींचा पुतळा, होळीच्या माळावरील शिर्काई मंदिराबरोबरच गडाची स्वच्छता करण्यात आली आहे.
आज पहाटे साडे पाच वाजता ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी दहा वाजता मुख्य राज्याभिषेक दिन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक होईल. त्यानंतर छत्रपती राजघराण्याच्या राजपुरोहिताच्या मंत्रोच्चारात राज्याभिषेक सोहळा पार पडेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
