एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रायगडावर 346 व्या शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह, ढोल ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना
आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 346 वा शिवराज्याभिषेक दिन आहे. यानिमत्ताने रायगड किल्ल्यावर राज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे.
रायगड : आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 346 वा शिवराज्याभिषेक दिन आहे. यानिमत्ताने रायगड किल्ल्यावर राज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण रायगड किल्ला सजवण्यात आला आहे. ढोल-ताशे, लेझीम आणि पोवाड्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना यावेळी मानवंदना देण्यात आली.
या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. तर सकाळी साडेनऊ वाजता महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले (कोल्हापूर) उपस्थित होते. 10 वाजून 10 मिनीटांनी मेघडंबरीत महाराजांना सुवर्ण नाण्याचा अभिषेक करण्यात आला.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. शिवराज्याभिषेक सोहळयासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी रायगडावर उपस्थित आहेत. सकाळपासूनच रायगडावर विविध कार्यक्रम सुरु आहेत. सकाळी शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांमध्ये तलवार, दांडपट्टा, भाला, फरी- गदगा यांचे सादरीकरण झाले. दरम्यान शिवभक्तांनी रायगडावर स्वच्छता मोहीमही राबवली.किल्ले रायगड येथे छत्रपती शिवरायांचे दर्शन. सर्वांना श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या अनंत शुभेच्छा. pic.twitter.com/jNYKS9Cs8q
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) June 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement