एक्स्प्लोर
Advertisement
तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त राज्यभर उत्साह
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. घाटकोपर येथे शिवजयंती उत्सव समिती घाटकोपरतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा आणि शिवरथ यात्रेवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. एक घाटकोपर एक शिवजयंती अशी संकल्पना राबवून शिवजयंती उत्सव समिती-घाटकोपरतर्फे एक घाटकोपर एक शिव रथयात्रा या संकल्पनेतून गेली 5 वर्षे एकच भव्य शिवजयंतीच मिरवणूक काढली जाते.
दोन दिवसा आधी 20 मार्चला किल्ले शिवनेरी जुन्नर ते घाटकोपर अशी शेकडो शिवभक्त तरुणांनी दौडत शिवज्योत आणली. या शिवज्योतची भव्य शिवरथ यात्रेसह संपूर्ण घाटकोपरमध्ये मिरवणूक काढली गेली. घाटकोपरच्या जय महाराष्ट्र गणेश मैदान येथून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमृतनगर अशी मिरवणूक काढण्यात आली.
यात फेटे,पारंपरिक वेशभूषेत शेकडो महिला , पुरुष या यात्रेत सहभागी होतील. किन्नर समाज, आराधी जोगती समाज आणि सर्वच पक्षाचे नेतेमंडळी शामिल झाली होती. घोडे, रथ, पुणेरी ढोल ताशे पथक इत्यादींसह छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषा केलेले तरुण यात सामील झाले होते. यात प्रथमच किन्नर समाज आणि जोगती, आराधी समाज यांच्या प्रतिनिधींनी शिवरथ यात्रेची पालखी खांद्यावर घेतली.अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अहमदनगर
अहमदनगरमध्ये देखील शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. नगर शहरातील शिवाजी महाराज चौक येथून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून संपूर्ण नगर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी या मिरवणुकीत भारताने केलेल्या एअर स्ट्राईकचा प्रतिकात्मक देखावा करण्यात आला होता.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा करून मिरवणुकीत सहभाग नोंदवला. ढोल पथक तसेच महिला देखील मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. या मिरावणुकीबरोबरच शहरात ठिक-ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
एबीपी माझाकडून व्हॉट्सॅपवर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राईब करा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement