एक्स्प्लोर

स्मारकात शिवसेनेचे सर्व मुख्यमंत्री असतील, तोतयागिरी करुन मुख्यमंत्री झालेले नसतील - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray :  शिवसेनेच्या नावावर तोतयागिरी करुन मुख्यमंत्री झालेल्यांचे फोटो स्मारकात नसतील, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

Uddhav Thackeray : शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात असतील, शिवसेनेच्या नावावर तोतयागिरी करुन मुख्यमंत्री झालेल्यांचे फोटो नसतील, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. मुंबईत आज बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक कसं असेल याचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. माझी ऊर्जा कधी कमी होत नाही, माझ्यात बाळासाहेब आहेत, त्यामुळे माझ्यातली ऊर्जा कधी कमी होतच नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारकडून मदत होतेय, मात्र त्यासंदर्भात सुभाष देसाई उत्तर देतील. आधी मी बोलतो नंतर देसाईंना माईक देतो, नंतर त्यांच्या हातून माइक परत घेणं बरोबर नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. 

17 तारखेला दहा वर्ष पूर्ण होतील, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा दहावा स्मृतीदिन आहे. स्मारकाचा विषय मध्ये मध्ये चर्चेत येतो. नेमकं स्मारक कधी आणि कसं होणार याबद्दल कुतूहल आहे. हे प्रेझेंटेशन बेसिक स्वरुपाचं आहे, बाकी देखील अनेक गोष्टी आपण तिथे करणार आहोत.  म्युझियम संदर्भात काम करत आहेत त्यांच्याबद्दल देखील चर्चा झाली. अनेकांनी विचारलं पुतळा कुठे असेल मात्र इथे पुतळा नाही.  हे म्युझियम प्रेरणा स्थान असणार आहे.- काहींना वाटतोय की वेळ लागतोय, मात्र ती हेरिटेज वास्तू आहे. त्या वास्तूला धक्का न पोहोचवतो काम करतो आहोत. संग्रहालयाला धोका पोहोचणार नाही असं बांधकाम करावं लागतंय, बाजूला समुद्र देखील आहे, जमिनीखाली देखील बांधकाम करावं लागतंय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

मी काही वृत्तपत्रांचे संपादकांशी देखील बोललो आहे. भाषणं आहे, मोर्चे आहेत. 1966 नंतरची काही भाषणं आपल्याकडे उपलब्ध नाहीत. ती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मार्मिकचे सर्व अंक रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही सर्व गोष्टी देखील आपण दाखवणार आहोत. लोकांना जिवंत अनुभव द्यायचा आहे. जो कोणी खचला असेल, त्यानं संग्रहालय बघितल्यावर त्याला प्रेरणा मिळेल एवढ्या ताकदीचे हे प्रेरणास्थान करायचं आहे. शिवसेना प्रमुखांचं जे आपल्याकडे सांगण्यासारखं असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. 

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक कसं असेल याचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील दिग्गज नेते उपस्थित होते. सुभाष देसाई यांनी सुरुवातीला स्मारकाबद्दल माहिती दिली. महापौर बंगल्यात हे स्मारक तयार करण्यात येत आहे. या प्रोजेक्टवर मॉनिटरींग म्हणून एमएमआरडीए करत आहे.  सगळी परवानगी मिळालेली आहे. जनतेला या स्मारक संदर्भात थोडी आज माहिती मिळणार आहे. प्रशासकीय इमारत बांधून झाली आहे. पहिल्या टप्प्याचे काम जानेवारीमध्ये पूर्ण होईल. आत्ता पर्यंत 58 टक्के काम झालं आहे. हा प्रकल्प पूर्ण करत असताना एकही झाड तोडले नाही. ऑक्टोबर 2023 पर्यंत हे स्मारक पूर्ण होईल, अशी माहिती सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. 

असं असणार आहे बाळासाहेब ठाकरेचं स्मारक !!

भव्य प्रवेशद्वार असणार आहे ज्या द्वारातून सर्वसामान्यांना आतमध्ये प्रवेश करता येणार आहे. 
प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर छोटं तळं बनवण्यात आलं आहे. 
तिकडून पुढे गेल्यानंतर तळघरात बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 
जुना महापौर बंगला हे आत्ताचं बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक असणार आहे. 
हि वास्तू हेरिटेज असल्यानं सर्व गोष्टींचा अभ्यासकरून बांधकाम करण्यात आलं आहे. 
स्मारकाच्या पाठीमागे समुद्र असल्यानं तळघरात काम करणं कठिण होतं समुद्राच्या लाटा येऊन भिंतींवर आधळत असतात, त्यामुळे इकडे काम करणं कठिण होतं त्यामुळे थोडा उशीर झाला आहे. 
बाळासाहेबांनी लिहिलेली पत्रं, भाषणं आणि फोटो या सर्वांच्या वापर इकडे करण्यात आला आहे. 
बाळासाहेबांनी काढलेल्या कार्टुनसाठी वेगळा कक्ष ठेवण्यात आला आहे ओरिजनल कार्टुन आहे तसेच मार्मिकचे अंक स्मारकात ठेवण्याचा प्रयत्न आहे. 
बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाचा पहिला नारळ वाढवून शुभारंभ केला ती खास आठवण या स्मारकात येतील .
पक्षाची आतापर्यंतची वाटचाल यामध्ये दाखवण्यात आली आहे. 
जवळपास १००० लोकं एकावेळी स्मारक पाहू शकतात.
पार्किॅगची व्यवस्था करण्यात आली आहे. 
खाण्यापिण्याची व्यवस्थेसाठी स्टॅाल करण्यात आले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget