(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भीती वाटणारी सत्ता उलथवलीच पाहिजे, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
Uddhav Thackeray : पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला.
मुंबई : सत्तेला घाबरत असाल तर काही करू शकत नाही. सत्तेची भीती वाटत असेल तर ती उलथवली पाहिजे. सत्ता आपली वाटली पाहिजे. नवं वर्ष सुरू होतोय हे वर्ष लोकशाहीची जावो, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह पाचोरा येथील स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी उपस्थित होत्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवेश कणाऱ्या सर्व नेत्यांचं स्वागत केले.
"शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सगळ्यांचं स्वागत करतो. वैशाली ताई यांचं कौतुक वाटतेय. आर ओ पाटील आमचा भक्कम माणूस होता.
त्यांचे जाणे आघात होता. पण त्यांचा वारसा वैशाली ताई पुढे नेतायत, असे उद्धव टाकरे म्हणाले. "
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी आज मातोश्री निवासस्थानी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधला. pic.twitter.com/RThTwEpxrZ
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 29, 2023
पक्ष नाही. चिन्ह नाही. तरीही...
पक्षप्रवेशावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी संजय राऊत म्हणाले की, आपल्याकडे पक्ष नाही. चिन्ह नाही. तरी लोक पक्ष प्रवेश करत आहेत. हाच वारसा वैशाली पाटील पुढे नेहत आहेत. उद्धव ठाकरेंचं बळ वाढवतय. शिवसेना सत्तेला लाथ मारते, असे संजय राऊत म्हणाले.
शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश -
पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश झालाय. शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रयत्नाने पक्षप्रवेश होत झालाय. स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रयत्नामुळे हा पक्षप्रवेश झालाय.
कोण आहेत वैशाली सूर्यवंशी ?
पाचोरा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, सभापती, माजी सरपंच दिवंगत आमदार आर ओ पाटील यांच्या वैशाली सूर्यवंशी कन्या आहेत. वैशाली पाटील आणि शिवसेना शिंदे गटात असलेले त्यांचे भाऊ त्या ठिकाणचे स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्यात मागील काही दिवसांपासून मोठा राजकीय वाद पाहिला मिळत आहे. यामध्ये आज शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर झाला आहे.
आणखी वाचा :
ठाकरे गटाच्या 23 जागा ठरल्या, सध्याचं चित्र काय, कोणत्या मतदारसंघात कोण खासदार?