Nashik News : 'चित्राताई कुठे आहात?' सोमैय्यांच्या कथित व्हायरल व्हिडीओनंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाचे आंदोलन
Nashik Kirit Somaiyya : कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणी नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
Nashik : भाजप नेते किरीट सोमैय्या (Kirit Somaiyya) यांच्या कथित व्हिडिओ क्लिप (Viral Video) प्रकरणी राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात देखील ठाकरे गटाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाच्या (Shivsena) शिवसेना कार्यालयासमोर असंख्य महिलांनी एकत्र येत किरीट सोमैय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत अनोखे आंदोलन केले.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियादेखील समोर येत आहेत. दरम्यान आज रोजी नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या महिला आघाडीने सोमय्यांविरोधात आंदोलन (Protest) केले. आता 'कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?' किरीट सोमैय्या हाय हाय, अशा आशयाच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आले. यावेळी सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकार्यांनी शालिमार चौकात किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणाचा खरपूस समाचार घेत तीव्र शब्दात निषेध करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले.
दरम्यान एका मराठी वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ प्रसारित केल्यानंतर किरीट सोमैय्या चांगलेच चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अशातच किरीट सोमय्या यांचा एका महिलेसोबतचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला वर्गात संतापाची लाट उसळली असून 'किरीट सोमय्या कोणत्या प्रवृत्तीचा माणूस आहे, हे त्याच्या घाणेरड्या कृत्यावरून सिद्ध झाले आहे. त्याच्या प्रतिमेला जोड्याने मारणे हा जोड्याचा अपमान असल्याच्या प्रतिक्रिया आंदोलक महिलांनी व्यक्त केल्या. भाजपचे कथित ‘फायरब्रँड’ नेते किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. नाशिकमध्ये महिलांनी सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून व ती पायदळी तुडवून निषेध नोंदविला.
'भाजप बाकी नेत्यांना चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतंय'
सुषमा अंधारे म्हणाल्या की, ''यासंपूर्ण प्रकरणात महिलांची गोपनीयता जपली पाहिजे. किरीट सोमय्यांनी जे काही केलं ते वाईटच आहेत. मात्र भाजपने यापूर्वी अनेक गोष्टी लपवल्या आणि जिरवल्या आहेत. किरीट सोमय्यांची भाजपसाठीची उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे त्यांचा व्हिडीओ आता अधिवेशनाच्या काळात बाहेर काढला आहे. गृहमंत्री त्यांच्यावर कारवाई करतील का असा प्रश्न आहे?'' दरम्यान, या अगोदर त्यांच्याकडे अनेक जणांनी कारवाई करण्याची मागणी केली. पण, त्यांनी केली नाही मग आताच हा व्हिडीओ बाहेर काढून भाजप बाकी नेत्यांना चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं अंधारे म्हणाल्या.
इतर संबंधित बातम्या :