पंतप्रधानांनी कुंभमेळ्यात डुबकी मारली, पण पीओपी मूर्तींना विसर्जन करू देत नाहीत; ठाकरेंचा मोदींना टोला
शिक्षक आपल्या पक्षाचा प्रचार का करु शकत नाही? शिक्षकांना प्रचारासाठी अडवणारे तुम्ही कोण? आरएसएस जिथे जातात तिथे पोखरायला लागतात, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

Uddhav Thackeray : पिढ्या पुढे जात आहेत. मराठी शाळा बंद पडत आहेत, हे दुर्दैव असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केलं. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घडवायचं काम तुम्ही करतात, बिघडविण्याचा काम आम्ही करतो म्हणजे मी नाही बाकी राजकारणी करतात असेही ठाकरे म्हणाले. शिक्षकांसोबतची वागणूक बदलायाला हवी, शिक्षक भरतीसुद्धा कंत्राटीदाराद्वारे होत आहे. कोण हा कंत्राटदार, शिक्षकांची कंत्राट भरती कशी करणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. शिक्षक आपल्या पक्षाचा प्रचार का करू शकत नाही? शिक्षकांना प्रचारासाठी अडवणारे तुम्ही कोण? आरएसएस जिथे जातात तिथे पोखरायला लागतात. वाळवी सारखं आपल्याला काम करायचं नाही असेही ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अधिवेशनात ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना देखील टोला लगावला. पंतप्रधानांनी सुद्धा कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारली, पण पीओपी मूर्तींना विसर्जन करु देत नाहीत असे ठाकरे म्हणाले.
धरावे असे गळे खूप दिसतात, पण ते धरता येत नाहीत
सातवीत बाळासाहेब आणि माझ्या आजोबाना पैसे नव्हते म्हणून शाळा सोडावी लागल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पण त्यांचं तसा अडलं नाही, पण शाळेत जाऊ नका असा मी म्हणणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शिक्षकांसोबतची वागणूक बदलायाला हवी, शिक्षक भरती सुद्धा कंत्राटदाराद्वारे होत आहे. कोण हा कंत्राटदार, शिक्षकांची कंत्राट भरती कशी करणार? असा सवाल ठाकरेंनी केला. पु ल देशपांडे म्हणतात, धरावें त्याचे पाय आणि हार घालावे तसें गळे दिसत नाहीत. धरावे असे गळे खूप दिसतात, पण ते धरता येत नाहीत हीच पंचायत आहे असेही ठाकरे म्हणाले.
तुमच्या मागण्या ऐकूण मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय
गुरुजनांना मी काय मार्गदर्शन करणार? मला खात्री नव्हती शिक्षक मतदारसंघ आपण जिंकू त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार असेही ठाकरे म्हणाले. आपण हा मतदारसंघ लढलो नव्हतो. शिक्षक आणि शिवसेना नातं कधी जुळेल असा वाटतं नव्हतं, पण ते नातं जुळलं असेही ठाकरे म्हणाले. एक गाणं आहे ना आमदार झाल्यासारखं वाटतंय, तसा तुमच्या मागण्या ऐकूण मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय असेही ठाकरे म्हणाले. सत्ता येते सत्ता जाते शिक्षकांचे ऋण फेडायला हवे. तुम्ही संस्कार दूत आहात असेही ठाकरे म्हणाले.
तुम्ही पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन करू देत नाही हे तुमचं कसलं हिंदुत्व?
कुंभमेळमध्ये अनेक जण डुबकी मारायला जात आहेत. प्रत्येकाची श्रद्धा आहे यावर मी बोलत नाही. पंतप्रधानांनी सुद्धा कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारली, पण पीओपी मूर्तींना विसर्जन करु देत नाहीत असे ठाकरे म्हणाले. अरे तिकडे पंतप्रधान डुबकी मारतात. पीओपी मुर्तीमुळे प्रदूषण होतं ठीक आहे. पण तुम्ही आदल्या दिवशी सांगतात की विसर्जन होऊ शकत नाही. माघी गणेशोत्सवातील अनेक मूर्ती विसर्जनाच्या राहिल्या आहेत. गणेश मूर्ती बघा आणि त्याचं काय करायचं आपण बघू असेही ठाकरे म्हणाले. तुम्ही ऐनवेळी नियम लावतात आणि पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन करू देत नाही हे तुमचं कसलं हिंदुत्व? असा सवालही ठाकरेंनी केला.
आरएसएसवाले जिथे जातात तिथे पोखरायला लागतात
E लर्निंग आपण सुरु केलं. व्हर्च्युअल शिक्षण महापालिकेच्या शाळेत आपण सगळ्यात आधी सुरू केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मी घरी बसून निदान काहीतरी काम केलं. यांनी घरोघरी जाऊन काय दिवे लावले माहित नाही असा टोला देखील ठाकरेंनी लगावला. विधानसभेचा निकाल मानायला तयार नाही. आता दिल्ली निवडणुकीत सुद्धा अरविंद केजरीवाल हरल्यानंतर कुंभकर्णासारख्या झोपलेल्यांनी उठून उठून प्रतिक्रिया दिली. तुम्ही निवडणूक यंत्रणेचे काम करु शकता पण निवडणूक प्रचाराचा काम तुम्ही करू शकत नाही. शिक्षक आपल्या पक्षाचा प्रचार का करू शकत नाही? शिक्षकांना प्रचारासाठी अडवणारे तुम्ही कोण? आरएसएस जिथे जातात तिथे पोखरायला लागतात. वाळवी सारखं आपल्याला काम करायचं नाही असेही ठाकरे म्हणाले. गाववाड्या वस्तीत जा, लोकांना दिशा दाखवा, तुम्ही शिवसेनेचे सदस्य व्हा, आता फावला वेळ आहे त्याच्यात प्रचार करा असेही ठाकरे म्हणाले.
लाडकी बहीण योजनेमध्ये 5 लाख बहीण अपात्र करता करतायेत
जिथे जिथे जातो तिथे म्हणतात उद्धवजी असा होऊ शकत नाही, तुमचा पराभव होऊ शकत नाही. आता लाडकी बहीण योजनेमध्ये 5 लाख बहीण अपात्र करता करतायेत. लाडका भाऊ दूरच आणि हे दृष्ट शिव भोजन थाळी जे आपण चालू करतो ती बंद करायला चालले आहेत असेही ठाकरे म्हणाले. ते तिकडे चालले डुबकी मारायला, डुबकी मारताना डुबला तरी चालेल. डुबकी मारणे हे आमचं हिंदुत्व नाही असेही ठाकरे म्हणाले.




















