एक्स्प्लोर

Deepak Kesarkar : आमच्यामध्ये कोणताही वाद नाही, राणेंसोबत एकत्र काम करण्यास तयार - दीपक केसरकर 

जिल्ह्यात नारायण राणेंसोबत काम करण्याची वेळ आली तर तयार असल्याचे, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितलं.  माझ्या प्रत्येक बोलण्याचा अर्थ नारायण राणेंशी जोडणं चुकीचं, असेही केसरकर म्हणाले.

Deepak Kesarkar on Narayan Rane :  नारायण राणेंसोबत एका मुद्द्यावर वाद झाले होते. आता आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. जेव्हा आमची भेट होते, तेव्हा आदराने वागतो. जिल्ह्यात नारायण राणेंसोबत काम करण्याची वेळ आली तर तयार असल्याचे, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितलं.  माझ्या प्रत्येक बोलण्याचा अर्थ नारायण राणेंशी जोडणं चुकीचं आहे, असेही केसरकर म्हणाले. यापुढे पत्रकार परिषदेत मी राणेंचं नाव घेणार नाही, हे सांगयलाही केसरकर विसरले नाहीत. 

मी काल केलेलं व्यक्तव होतं त्याबद्दल मी स्पष्ट करतो की, उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करायची होती याबद्दल कोणीही बोललं नाही. मी बोललो त्यामध्ये खोटं आहे, असंही कुणी बोलले नाही. म्हणजे त्यांना युती करायची होती पण आम्ही केली तर ते चुकीचं असं कसं?, असे केसरकर म्हणाले. 

आम्ही शिंदे साहेबांच्या साथीनं जे केलंय ते लोकांना मान्य आहे. माझा आणि राणेंचा वाद जगाने पाहिला आहे, मी यापुढे राणेंचं नाव पत्रकार परिषेदत घेणार नाही. मी आयुष्यात काही तत्व पाळतो, त्यामध्ये मी पवारांचं नाव कधी घेतलं नाही. तसंच राणेंचं नाव घेणार नाही, असे केसरकर म्हणाले.  

जेव्हा उद्धव ठाकरेंना भाजपा सोबत युती करायची होती तेव्हा त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले होते असे नाही. त्यामुळे आम्ही भाजपासोबत केलेल्या युतीनंतर आम्हाला विश्वासघातकी किंवा गद्दार का म्हणतात? असा सवाल केसरकर यांनी विचारला. 'अनेक शिवसैनिकांचे मला फोन येतात की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणा, मात्र हे प्रयत्न मी केले आहेत. मी जेवढा पुढाकार घ्यायचा तेवढा घेतला, मात्र कालचे आदित्य ठाकरेंचे स्टेटमेंट बघितले तर पेपर नॅपकीन वापरुन फेकावा असे होते, असेही केसरकर म्हणाले. ' 

तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत प्रेम असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. भाजपाने महापालिकेत शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तुम्ही स्वप्नात वावरत आहात, माझी तुम्हाला विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही जमिनीवर या, असेही केसरकर म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Embed widget