एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

2023 सालाने अरेरावी पाहिली, 2024 ला काय होणार? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : 2023 वर्षाला निरोप दिलाय. नव्या वर्षात काही आशायदाक घडेल का? राममंदिराचा घंटानाद होऊन देश त्याच वातावरणात सार्वत्रिक निवडणुकांना समोरा जाईल, असेही राऊतांनी अग्रलेखात म्हटलेय. 

Sanjay Raut : नवे वर्ष उद्या उजाडेल, त्यानं काय होणार? असंख्य थापा, आश्वासनांचे ओझे घेऊन 2023 वर्ष पुढे सरकले. वेगळे काय झालं? आत्ममग्न सत्ताधाऱ्यांच्या हाती देशाची सुत्रे आहेत. त्यांची तपस्या नव्या वर्षात भंग होवो, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून केलाय. 2023 वर्षाला निरोप दिलाय. नव्या वर्षात काही आशायदाक घडेल का? राममंदिराचा घंटानाद होऊन देश त्याच वातावरणात साव्रत्रिक निवडणुकांना समोरा जाईल, असेही राऊतांनी अग्रलेखात म्हटलेय. 


नवीन वर्षात काही आशादायक घडेल काय? ?

सरकारने मारलेल्या थापा आणि भरमसाट आश्वासनांचे ओझे घेऊन जुने वर्ष सरते आहे. नवे वर्ष उगवते आहे. भारतालाच नव्हे, तर जगाला दुरवस्थेकडे नेणारे वर्ष म्हणून 2023 हे वर्ष दीर्घकाळ लक्षात राहील. आत्ममग्न सत्ताधाऱयांच्या हाती भारत देशाची सूत्रे आज आहेत. त्यांच्या आत्ममग्नतेची तपस्या भंग करणाऱया सर्वांनाच देशाचे दुश्मन ठरवून सरळ तुरंगात टाकले जाते, अशा अवस्थेला आपण पोहोचलो. त्यामुळे नवीन वर्षात काही आशादायक घडेल काय? रशियाने पेन बेचिराख केले. इस्रायलने गाझापट्टीत 40 हजार लोकांना ठार केले. त्यात लहान मुले व स्त्रिया जास्त. जगभरात असे अमानुष हत्याकांड सुरू असताना ‘युनो’ने फक्त बघ्याची व इशारे देण्याचीच भूमिका बजावली. चीन, रशिया, अमेरिका युरोपियन राष्ट्रांचे संघटन युनायटेड नेशन्सना कसे दुर्लक्षित करतात ते पोन आणि गाझातील नरसंहाराने दिसले. भारतात मणिपूर आणि जम्मू-कश्मीरात शेकडो निरपराध्यांचे बळी गेले व सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे युनोला तरी का दोष द्यावा? सरकारने पाच राज्यांत निवडणुका घेतल्या. त्यातील तीन राज्यांत मोदी पक्ष विजयी झाला. तोच उन्माद घेऊन मावळत्या वर्षात अयोध्येतील राममंदिराचे उद्घाटन होईल. राममंदिराचा घंटानाद घेऊन देश त्याच वातावरणात सार्वत्रिक निवडणुकांना सामोरा जाईल. शेवटी भक्ती कमी व मतांचा व्यापार जास्त. 2023 हे वर्ष फार वेगाने संपले आणि गतवर्षाने काही चांगले पेरून न ठेवल्यामुळे 2024 हे वर्ष अधिक अशांततेचे आणि देशाला व जगाला अधिक दुरवस्थेकडे नेईल असे दिसते, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय.  पुढच्या चार महिन्यांत देशात सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल आणि हे सारे कशासाठी, यामधून सामान्य भारतीय माणसाचे भवितव्य कसे सुधारणार, असा चेहरा करून सामान्य माणूस महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे ओझे खांद्यावर घेउढन आपली वाटचाल कशीबशी चालू ठेवील. राजकारण्यांवरील उरलासुरला विश्वासही 2023 साली नष्ट केला हे मान्य केले तर देशातील संसद, न्यायालये, वृत्तपत्रे यांवर विश्वास ठेवावा अशी स्थिती राहिली आहे काय? असेही राऊत म्हणाले.

लोकशाहीचे पूर्ण वस्त्रहरण झालेले मावळत्या वर्षाने पाहिले - 

 2023 ने भारत देशाची जितकी बेअब्रू झाली तशी ती कधीच झाली नसेल. भारताच्या आालिम्पिक विजेत्या महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणाविरुद्ध दिल्लीच्या जंतर मंतर रोडवर आंदोलनास बसल्या तेव्हा मोदी-शहांच्या पोलिसांनी जबरदस्तीने त्यांना आंदोलन मागे घ्यायला लावले. भारतीय कुस्ती संघाच्या निवडणुकीत शोषणकर्त्या भाजप नेत्यांचेच ‘चेले’ पुन्हा निवडून आले व सरकारने हस्तक्षेप केला नाही. तेव्हा भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्ती त्यागण्याचा निर्णय जाहीर केला. अनेक कुस्तीपटूंनी पंतप्रधान मोदींच्या दारात जाऊन पद्मश्री, राष्ट्रीय खेलरत्न यांसारखे पुरस्कार परत केले. असे याआधी कधीच घडले नव्हते, असे राऊत म्हणाले.  

‘ईव्हीएम’मध्ये दडले आहे काय? 

लोकशाहीचे पूर्ण वस्त्रहरण झालेले मावळत्या वर्षाने पाहिले.  देशाच्या संस्कृतीचे वस्त्रहरण भाजपचे आधुनिक धृतराष्ट्र उघडय़ा डोळय़ाने पाहत राहिले. या सगळय़ावर उतारा म्हणून राममंदिराचा उद्घाटन सोहळा भव्य स्वरूपात करून लोकांना गुंग केले. नरेंद्र मोदी यांनी तीन राज्ये जिंकल्यावर पुन्हा जाहीर केले की, ‘2024 ला आम्हीच सत्तेवर येऊ. साडेतीनशे जागा जिंकू.’ देशाची मानसिकता भाजपास विजयी करण्याची नाही, पण भाजप जिंकत आहे. ते रहस्य ‘ईव्हीएम’मध्ये दडले आहे काय? जिंकण्याची एवढीच खात्री असेल तर एकदा मतपत्रिकेवर निवडणुका घेऊन विजयी होऊन दाखवा हे आव्हान स्वीकारायला मोदी-शहा तयार नाहीत, असे राऊत यांनी अग्रलेखात म्हटलेय. 

संसदेत काय घडले ?

2023 च्या अखेरीस भारतीय संसदेत जे घडले त्यामुळे देशाच्या राजकीय आणि सांस्कृतिक तसेच आर्थिक अशा तिन्ही स्थितीबद्द} विचार करण्याची वेळ आली आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढते आहे असे सांगणारे किती खोटे बोलतात त्याचे पुरावे समोर आले. भारतावरील कर्जाचा बोजा 205 लाख कोटींवर गेला व हा आकडा चिंताजनक असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला. 61,050 कोटी डॉलर इतके विदेशी कर्ज आज देशावर आहे. इतके कर्ज कशासाठी? तो सर्व पैसा कोणावर उधळला? हे जनतेला समजायलाच हवे. कोविड काळात कर्नाटकातील भाजप सरकारने 40,000 कोटींचा भ्रष्टाचार केला. हे भाजपचे आमदार बसवय्या पाटील जाहीरपणे सांगतात. मुंबईतील ‘कोविड’ प्रकरणांची चौकशी करणाऱया केंद्रीय तपास यंत्रणा त्यावर काहीच कारवाई करणार नाहीत. कारण सर्व तपास यंत्रणा व कारवायांचे बडगे फक्त भाजपच्या विरोधकांसाठीच आहेत. मावळत्या वर्षात विरोधी पक्षाचे 150 खासदार निलंबित केले. संसदेतील घुसखोरीवर सरकारला जाब विचारणे हा त्यांचा अपराध ठरला. त्याबद्दल त्यांना संसदेतूनच काढले. ही कसली लोकशाही? 2023 सालाने ही अरेरावी पाहिली. 2024 ला काय होणार, हा प्रश्नच आहे.

पाय मातीचे 

पंतप्रधान मोदी इतरत्र जातात. भाषणे देतात. पण आपले पंतप्रधान संसदेत फिरकत नाहीत. विशेष काही घडलं की लोकसभेत धावत येणाऱया नेहरू-शास्त्रींचा जमाना केव्हाच मागे पडला आणि लोकसभेत हजर न राहण्याची परंपरा निर्माण करणाऱया मोदी-शहा यांचे अध्वर्यू सत्तेवर आहेत हे आपण विसरलो आहोत. ‘मोदी म्हणजे अदानी’ हे नवे समीकरण 2023 वर्षात पक्के झा}s. देशातील अर्थकारण  एका उद्योगपतीच्या हाती आहे. तो बोट दाखवील ते जंग, ती जमीन, तो प्रकल्प त्याला मिळतो. अदानीवर प्रश्न विचारणाऱया खासदार महुआ मोईत्रांनाही आता संसदेतून बाहेर काढले. अदानी यांच्यासाठी मुंबईसह संपूर्ण देशाची लूट चालली आहे. मुंबईतील धारावी व छत्तीसगढचे जंगलही अदानींना दिले. त्याविरोधात जनताच रस्त्यावर उतरली. पूर्वी देश सर्व मिळून }gटत होते. 2023 सालात तो एकाच उद्योगपतीने लुटताना आपण पाहिले. पण न्यायालयात जाऊनही उपयोग नाही. चंद्रचूड यांच्या काळात बरे घडेल असे सुरुवातीला वाटले, पण शेवटी न्यायव्यवस्थेत सगळय़ांचेच पाय मातीचे. नव्या वर्षात हे मातीचे पाय विरघळून देश भक्कम पायावर उभा राहो, असे संजय राऊत म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 29 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सBaba Adhav Pune Protest : विधानसभा निवडणुकीत पैशांचा मोठ्याप्रमाणात वापर, आढाव यांचा आरोप; पुण्यात आंदोलनBJP Protest For EVM Support : मुंबईत ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन; सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर सहभागीSahmbhuraj Desai PC : दिल्लीच्या बैठकीत काय काय घडलं? शंभुराज देसाईंनी सांगितली इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Vijay Wadettiwar : मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
Sushant Singh Rajput : 'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
Embed widget