एक्स्प्लोर

शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ, ईडीकडून चौकशी सुरु, किरीट सोमय्या म्हणाले...

खासदार भावना गवळीच्या संबंधित काही संस्थांच्या चौकशीसाठी वाशिम येथे ईडीच्या टीम दाखल झाल्या आहेत. दरम्यान, भावना गवळी यांचं घर आणि कार्यालय जप्तीची नोटीस काढण्यात आली असल्याचा दावा भाजपनं केला आहे. 

वाशिम: यवतमाळ वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Bhavna Gawali) यांच्या संबंधित काही संस्थांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.  आज खासदार भावना गवळीच्या संबंधित काही संस्थांच्या चौकशीसाठी वाशिम येथे ईडीच्या टीम दाखल झाल्या आहेत. दरम्यान, भावना गवळी यांचं घर आणि कार्यालय जप्तीची नोटीस काढण्यात आली असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. 

एकेकाळी भावना गवळींच्या वडिलांचा सोबती असलेले शिवसैनिक हरीश सारडाने यांनी भावना गवळींची ईडीला तक्रार केली आहे. त्यानंतर हे प्रकरण भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरले. एवढेच नाही तर सोमय्यांनी वाशीमला येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यांच्याविरोधात 100 एकर जमीन असलेल्या बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्याबाबतच्या एकूण खरेदी-विक्री व्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली आहे.    

काय म्हणाले किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, भावना गवळी यांच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळयावर आज ईडीने कारवाई केली. मी समाधानी आहे. भावना गवळी यांनी 55 कोटी रुपयांचा कारखाना त्यांच्याच बेनामी कंपनीला अवघ्या 25 लाखाला दिला.  मुख्यमंत्री कार्यालय यांच्या दबावाखाली फक्त एफआयआर केली.   भावना गवळी यांच्या कार्यलयातून 60 कोटी रुपये चोरीला गेले. एवढे पैसे आले कुठून भावना गवळी यांचं घर आणि कार्यालय जप्तीची नोटीस काढण्यात आली आहे, असं सोमय्या म्हणाले.   भावना गवळी यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे बाकी इतर संस्थांच्या कारवाई होणार आहे, असं ते म्हणाले. 

 काय आहेत आरोप 

1992 ला पणन संचालकांकडे श्री बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखाना मर्यादित पुंडलिकनगर रजिस्टर झाला. ज्याचे अध्यक्ष होते भावना गवळींचे वडील पुंडलिकराव 

राष्ट्रीय सहकार निगम ने कारखान्याला रुपये 43.35 कोटी निधी दिला. ज्याचे हमीपत्र राज्य शासनाचे होते   

2001  पर्यंत कारखाना सुरु केला नाही, पण मशीन, बिल्डिंग सगळी उभी झाली  

2001  ला स्वतःची मुलगी खासदार भावना गवळी अध्यक्ष असलेल्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानाला शासनाची परवानगी न घेता आणि निविदा न काढता सहकारी कारखान्याची 14 हेक्टर जमीन विकत दिली 

2001 ला खासदार भावना गवळी कारखान्याच्या अध्यक्ष झाल्या 

2007  मध्ये तत्कालीन पणन संचालक, पणन मंत्री आणि वित्त मंत्री ह्यांनी कारखाना अवसनात काढण्याची परवानगी दिली 

परवानगी मजेशीर होती असा आरोप, ज्या अध्यक्षाने म्हणजे भावना गवळी यांनी कारखाना बुडवल्याचा आरोप आहे त्यांनाच  LIQUIDATOR नेमले 

अवसायक मंडळावर असणारे इतर सदस्य - भावना गवळींच्या आई शालिनीताई  आणि त्यांच्याच संस्थेचा सदस्य मदन रामजी काळे आणि नातेवाईक श्यामराव जाधव 

कारखाना विकायची परवानगी मागितली पण प्रस्ताव पाठवताना २२/८/२००८ ला वाशीमचे जिल्ला उपनिबंधक यांनी ज्या अटीशर्ती टाकल्या होत्या त्या पाळल्या नाहीत

तिसऱ्यांदा जाहिरात काढली, जुलै २०१० ला  तालुका स्तराच्या वर्तमानपत्रात. टेंडर मंजूर केले 

टेंडर मिळालेल्या कंपनीचे नाव - भावना ऍग्रो प्रॉडक्ट्स अँड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड - अशोक गांडोळे यांचे 90% शेयर्स जे भावना गवळींचे अधिकृत पीए आहेत

निविदा मंजूर केलेल्या कंपनीचे पैसे नाहीत 

मग शासनाची परवानगी न घेता तत्कालीन पणन संचालक ह्यांनी बँक गॅरंटीवर कारखाना विकण्याची परवानगी दिली

परत टेंडर काढायला पाहिजे होते, ते ही केले नाही 

16  ऑगस्ट 2010 ला निविदा न काढता पीए असणाऱ्या गांडोळेला कारखाना विकला

बँक गॅरंटीची अट होती ज्यात द रिसोड अर्बन कोपराटीव्ह क्रेडिट सोसायटी यांची रुपये 6.84 कोटी बँक गॅरंटी घेतली   

ज्या क्रेडिट सोसायटीने हि बँक गॅरंटी दिली त्या पत संस्थेच्या अध्यक्ष ही भावना गवळीच 

बँक गॅरंटी देताना रिसोड अर्बन क्रेडिट सोसायटीने काहीच मॉर्गेज घेतले नाही 

हे पैसे शासनाकडे भरण्याची जवाबदारी LIQUIDATOR बोर्डाकडे होती, ते पैसे अजून ही भरलेले नाही . न ते पैशे पतसंस्थेने भरले 

जो सहकारी कारखाना होता तो अश्या पद्धतीने पीएशी संगनमत करून गिळंकृत केल्याचा आरोप 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget