एक्स्प्लोर

शिवसेना आमदार योगेश कदम यांचा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. खासदाराविरोधात आमदाराने हक्कभंगाचा प्रस्ताव देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे.

दापोली (रत्नागिरी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. आमदार योगेश कदम विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. खासदाराविरोधात आमदाराने हक्कभंगाचा प्रस्ताव देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे. यावरुन महाविकास आघाडी सरकार एकत्रित असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तटकरे दापोली विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमांना आपल्याला निमंत्रण देत नाहीत. तसंच आपल्याला विश्वासात न घेता कार्यक्रम करत असल्याचे कारण देत आमदार योगेश कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे.

मंडणगड तालुक्यातील पुलासाठी तटकरेंसोबत आपणही प्रयत्न केले. कार्यारंभ आदेश येण्याआधीच यांनी भूमिपूजन उरकलं. स्थानिक आमदार असूनही आपल्याला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नाही किंवा भूमिपूजनाच्या फलकावर नावही टाकलं नाही, असा आरोप योगेश कदम यांनी केला आहे. तटकरे यांचं हे राजकारण गंभीर असून आपल्या हक्कांवर गदा आणणारं आहे, असं सांगत आमदार योगेश कदम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव पाठवला आहे.

योगेश कदम यांचे आरोप काय? योगेश कदम यांनी आरोप केला आहे की, "माझ्या दापोली मतदारसंघात काही दिवसांपूर्वी भूमिपूजनाचे कार्यक्रम झाले. खासदार तटकरे उपस्थित होते. त्या कार्यक्रमांचं निमंत्रण मला नव्हतं. हा श्रेयवादाचा विषय नाही. पण माझ्या मतदारसंघात मला डावलून भूमिपूजन करणं हे आमदार म्हणून माझ्या हक्कांवर गदा आणणारं आहे. हे सहन करण्याच्या पलिकडे गेलं आहे. भूमिपूजन करताना त्या फलकावर माझ्या नावाचा उल्लेख करत नाही. मला कुठल्याही कार्यक्रमाचं निमंत्रण नाही. मला वाटतं जाणूनबुजून डावलण्याचं काम त्यांच्याकडून झालं. त्यामुळे मी ही भूमिका घेतली. जे घडलं ते अपेक्षित नव्हतं. सुनील तटकरे यांच्या आढावा बैठकांनाही निमंत्रण दिलं जात नाही. याआधीही खेड नगरपरिषदेच्या हद्दीतही चिपळूणच्या आमदारांनी येऊन उद्घाटन केलं, पण मला निमंत्रण नव्हतं. जाणूनबुजून होत असेल तर मला माझी भूमिका स्पष्ट करावी लागेल."

दरम्यान, योगेश कदम यांच्या आरोपांवर खासदार सुनील तटकरे यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget