Tanaji Sawant : औकातीत राहावं! जशास तसं उत्तर देऊ, तानाजी सावंतांचा इशारा
एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवेसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिला आहे.
Tanaji Sawant : आमचे गटनेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवेसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिला आहे. शिवेसेनेचे भूम-परांडा तालुक्याचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तानाजी सावंत यांनी जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं असेही ते म्हणालेत.
शिवेसेनचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे जवळपास 40 आमदार घेऊन आसाममधील गुवाहटीत पोहोचले आहेत. त्यामुळं राज्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहे. काही ठिकाणी आंदोलने, मोर्चे निघत असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच शिवेसेनेचे भूम-परांडा तालुक्याचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी बंडोखोरी केल्यामुळं शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात पवित्रा शिवसैनिक पवित्रा घेत असल्याचे चित्र दिसत आहे. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यलयावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. या घटनेनंतर तानाजी सावंत यांच्या पुण्यातील निवासस्थाना बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्या ठिकाणी तणावाचे वातावर दिसत आहे. शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात जमले असून तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आहेत. तानाजी सावंत भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. 2014 साली शिवसेना भाजपच्या सत्तेत तानाजी सावंत यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, 2019 ला महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर शिवसेनेनं तानाजी सावंत यांनी मंत्रीपदाची संधी दिली नाही. तेव्हापासूनच तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा होती. अखेर बंडखोरी करत ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या: