Shiv Sena Maharashtra MLA Disqualification Case Verdict LIVE Updates : शिंदेंचे आमदारही पात्र, ठाकरेंचे आमदारही पात्रच; विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय
Shiv Sena Maharahtra MLA Disqualification Case Verdict LIVE Updates: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्ष जाहीर करणार आहेत.
LIVE
Background
Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE Updates: मुंबई : राज्याच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेला... शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय अवघ्या दीड तासांवर येऊन ठेपलाय. दुपारी साडेचार वाजल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात येईल. जवळपास एक ते दीड तास निकालाचे वाचन होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचतील. या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाणार आहे. साऱ्या देशाचं लक्ष आजच्या निकालाकडे लागून राहिलंय. मुख्यमंंत्री एकनाथ शिंदेच अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा धक्का असेल. कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ 16 आमदार शिल्लक आहेत, त्यातील 14 अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालात हे असू शकतात ठळक मुद्दे...
- एकूण 34 याचिकांचे 6 गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली. त्यानुसार, सहा गटांत निकाल वाचला जाईल
- सुमारे 200 पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे 1200 पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे.
- परिणामी, सहा गटांतील निकालाचा सारांश केवळ वाचला जाईल. याउलट संपूर्ण निकालाची प्रत ही दोन्ही गटांना पाठवली जाईल.
पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. - सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होतील.
- अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार हे स्पष्ट होतील.
- राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष यांच्या कार्यकक्षा स्पष्ट होतील.
Shiv Sena Maharahtra MLA Disqualification Case Verdict LIVE Updates : अपात्रतेची टांगती तलवार असणारे दोन्ही गटातील आमदार
शिवसेना शिंदे गट 16 आमदार
1) एकनाथ शिंदे
2) चिमणराव पाटील
3) अब्दुल सत्तार
4) तानाजी सावंत
5) यामिनी जाधव
6) संदीपान भुमरे
7) भरत गोगावले
8) संजय शिरसाठ
9) लता सोनवणे
10) प्रकाश सुर्वे
11) बालाजी किणीकर
12) बालाजी कल्याणकर
13) अनिल बाबर
14) संजय रायमूळकर
15) रमेश बोरनारे
16) महेश शिंदे
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार
1) अजय चौधरी
2) रवींद्र वायकर
3) राजन साळवी
4) वैभव नाईक
5) नितीन देशमुख
6) सुनिल राऊत
7) सुनिल प्रभू
8) भास्कर जाधव
9) रमेश कोरगावंकर
10) प्रकाश फातर्फेकर
11) कैलास पाटील
12) संजय पोतनीस
13) उदयसिंह राजपूत
14) राहुल पाटील
Ujjwal Nikam On MLA Disqualification Verdict : अपात्रतेचा निकाल 3 मुद्द्यांवर आधारित : उज्ज्वल निकम
Amdar Apatra Nikal LIVE: मालेगाव : मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयासमोर शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष
Aamdar Apatrata Nikal LIVE Updates: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला राज्यभरातून शिवसैनिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून मालेगावात पालकमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयासमोर शिंदे गट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोसम पुल चौकात फटाक्यांची आतशबाजी करत पेढे वाटप करून आंदोत्सव साजरा केला.
Bharat Gogawale on MLA Disqualification : Whip मान्य झाल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया
Shrikant Shinde : अफजलखानाचा कोथळा दोनदा बाहेर काढला, एकदा शिवरायांनी...दुसऱ्यांदा...
Sanjay Gaikwad on MLA Disqualification Case: अध्यक्षांनी आमच्यावर अन्याय केला, त्या विरोधात आम्ही न्यायिक मार्गानं न्याय मागणार : संजय गायकवाड
Sanjay Gaikwad on MLA Disqualification Case LIVE: संजय गायकवाड म्हणाले की, "जर आमच्या गटाचे आमदार हे अपात्र नाहीत तर मग ठाकरे गटाचे आमदार पात्र कसे कारण एक जर चुकला नसेल तर दुसरा नक्कीच चुकला असेल आणि त्यामुळे अध्यक्षांनी दिलेला न्याय हा आमच्यावर जरी चांगला असला तरी हा अन्याय आहे . कारण आम्हाला जरी न्याय मिळाला असला तरी हा आमच्यावर अन्याय असल्यासारखा आहे कारण ठाकरे गटाचे आमदार हे पात्र होऊच शकत नाही आणि त्यामुळे अध्यक्षांनी आमच्यावर एक प्रकारे अन्याय केला आहे आणि आम्ही सनदशीररित्या याबाबतीत पुढील न्यायीक मार्गाने न्याय मागू."