एक्स्प्लोर

Shiv Sena MLA Disqualification :  शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणा सोमवारपासून अंतिम सुनावणी; दोन्ही गटाचे वकील करणार युक्तिवाद

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान अंतिम युक्तिवाद सुरू होणार आहे.

Shiv Sena MLA Disqualification :  शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case Hearing) आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच 18 डिसेंबरपासून या प्रकरणातील अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर (Maharashtra Assembly Speaker) तीन दिवस ही सुनावणी सुरू असणार आहे. यातील प्रत्येकी दीड-दीड दिवस शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Group) वकिलांना युक्तिवाद करता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना (Rahul Narwekar) 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्यास मुभा दिली आहे. याआधी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. 

साधारणतः दीड वर्षांहून जास्त काळ महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात गटात सुरू असलेला आमदार अपात्रतेचा वाद आगामी वर्षाच्या सुरुवातीला निकाली निघणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. 

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील अंतिम सुनावणीला उद्या सुरुवात होणार आहे.  उद्या सकाळी साडेआठ वाजता सकाळच्या सत्रातील अंतिम सुनावणीला सुरुवात होईल. तर दुपारी अध्यक्षांच्या कामकाजातील वेळेनुसार दुसऱ्या सत्रातील अंतिम सुनावणी होणार आहे. 18, 19 आणि 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडून पूर्ण केली जाणार आहे. 

शिवसेना दोन्ही गटाची उलट तपासणी झाल्यानंतर आणि लेखी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोरील या प्रकरणातील सुनावणीचा हा शेवटचा टप्पा असणार आहे.  यानंतर 10 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना या सगळ्या प्रकरणाचा निकाल देणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपेक्षित आहे. 

दोन्ही बाजूंकडून उलट तपासणी 

विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना ठाकरे आणि शिवेसना शिंदे गटाच्या वकिलांनी उलट तपासणी घेत साक्ष नोंदवली.शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनीस प्रभू यांची उलट तपासणी शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी घेतली. त्यावेळी अॅड. जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना व्हीपच्या मुद्यावर घेरले. प्रभू यांनी व्हीप जारीच केला नाही हे ठरवण्याच्या अनुषंगाने प्रश्न केले. जेठमलानी यांच्या प्रश्नांवर प्रभू यांनीदेखील जोरदार पलटवार केला. अॅड. जेठमलानी यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या विधीमंडळ कार्यालयीन सचिव  विजय जोशी यांचीदेखील साक्ष नोंदवली. तर, ठाकरे गटाकडून अॅड. देवदत्त कामत यांनी शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी केली. अॅड. कामत यांच्या उलट तपासणीत शिंदे गटाच्या आमदारांनी व्हीप मिळाला नसल्याचे म्हटले होते. कामत यांनी शिंदे गटाच्या आमदारांकडून दिशाभूल केली जात असल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, उदय सामंत, योगेश कदम, दीपक केसरकर, दिलीप लांडे आणि खासदार राहुल शेवाळे यांची उलट तपासणी झाली. यातील काही आमदारांनी आपण ठाकरे गटाच्या बैठकीत उपस्थित नसल्याचा दावा करत कोणत्याही कागदपत्रांवर, ठरावावर स्वाक्षरी केली नसल्याचा दावा केला. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला दिलासा, टीकेचे झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई अखेर रद्द, नेमकं प्रकरण काय?
पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला अखेर दिलासा, टीकेचे झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई रद्द, नेमकं प्रकरण काय?
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ
खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget