एक्स्प्लोर

राज ठाकरेंना धक्का, शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर?

गेल्या काही दिवसांपासून शिशीर शिंदे हे मनसेच्या पक्षाच्या विभागवार बैठका आणि कार्यक्रमापासून दूर राहत होते.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक शिशीर शिंदे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिशीर शिंदेंनी गेल्यच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, पुढील राजकीय वाटचालीबाबत प्रदीर्घ चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी रणनीतींपासून दूर ठेवल्याने शिशीर शिंदे पक्षावर नाराज होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून, मनसेच्या नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती केली होती. गेल्या काही दिवसांपासून शिशीर शिंदे हे मनसेच्या विभागवार बैठका आणि कार्यक्रमांपासून दूर राहत होते. कोण आहेत शिशीर शिंदे? शिशीर शिंदे हे मनसेचे विद्यमान सरचिटणीस आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे जे 13 आमदार निवडून आले होते, त्यामध्ये भांडुपमधून शिशीर शिंदे विजयी झाले होते. अत्यंत धाडाडीचे नेते आणि डॅशिंग आमदार म्हणून ते कायमच परिचित राहिले आहेत. शिशीर शिंदेंची राजकीय कार्यकीर्द : - 64 वर्षीय शिशीर शिंदे यांनी आपली राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरु केली. - 1992 साली ते शिवसेनेचे मुलुंडचे नगरसेवक होते. - शिवसेनेने त्यांना उपनेतेपद दिलं होते - शिवसेनेची अनेक आंदोलनं त्यांनी गाजवलं. - बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली होती. - शिशीर शिंदेंनी 1991 मध्ये वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली होती. - 1996 ते 2002 या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते. - त्यांनी 2006 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत, राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला. - मनसेकडून त्यांनी 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती, मात्र तिथे त्यांचा पराभव झाला. - त्याच वर्षी शिशीर शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला होता. मात्र विधानसभा सभागृहात शपथघेण्यापूर्वीच त्यांना मुंबई आणि नागपूर विधानसभेतून चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. - सपा आमदार अबू आझमी यांच्या हिंदीतील शपथेला विरोध करत, त्यांच्यावर मनसे आमदारांनी सभागृहातच हल्ला केला होता. या प्रकरणात शिशीर शिंदे निलंबित झाले होते. मात्र 2009 मध्ये त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली. आतापर्यंत कुठल्या नेत्यांचा मनसेला राम राम? नाशिकमधील वसंत गिते, मुंबईमधील राम कदम आणि प्रवीण दरेकर यांसारखे बडे नेते मनसेतून आतापर्यंत बाहेर पडले आहेत. त्यानंतर आता शिशीर शिंदे हे सुद्धा बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

18 कोटी खर्चून रस्ता केला, 3 महिन्यातच 10 फुटाचा खड्डा पडला, ठेकेदाराचाच ट्रक खड्ड्यात घुसला, नागरिकांचा संताप
18 कोटी खर्चून रस्ता केला, 3 महिन्यातच 10 फुटाचा खड्डा पडला, ठेकेदाराचाच ट्रक खड्ड्यात घुसला, नागरिकांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Supriya Sule: ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा

व्हिडीओ

Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
No Sugar Challenge : 1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Sonal Dinusha: पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
Supriya Sule: ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
Embed widget