एक्स्प्लोर
Advertisement
शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून शहीदांच्या कुटुंबीयांसाठी 2.51 कोटी रुपयांची मदत
शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देशभरातील सर्व साईभक्तांच्या व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने 2.51 कोटी रुपयांचा निधी देण्यासंदर्भात मी संस्थानच्या सर्व विश्वस्तांची चर्चा केली आहे. मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयास व शासनाच्या परवानगीस अधिन राहून सदरचा निधी देण्यात येईल असेही डॉ. हावरे यांनी सांगितले.
शिर्डी : जम्मू व काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने 2.51 कोटी रुपयांची मदत निधी देणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.
जम्मू व काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले आहेत. या घटनेचा सर्व स्तरातून संताप व निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याला देशाचे सैन्य आणि शासन उत्तर देईलच पण आपल्या संवेदना सर्व देशाने व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या संवेदनांचा आदर श्री साईबाबा संस्थान करत आहे. त्या संवेदना व्यक्त करुन या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देशभरातील सर्व साईभक्तांच्या व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने 2.51 कोटी रुपयांचा निधी देण्यासंदर्भात मी संस्थानच्या सर्व विश्वस्तांची चर्चा केली आहे. मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयास व शासनाच्या परवानगीस अधिन राहून सदरचा निधी देण्यात येईल असेही डॉ. हावरे यांनी सांगितले.
VIDEO | शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून शहीदांच्या कुटुंबीयांसाठी 2.51 कोटी रुपयांची मदत | शिर्डी | एबीपी माझा
याआधी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांसाठी श्री सिद्धिविनायक मंदीर न्यासाकडून 51 लाखांची मदत जाहीर केली आहे. याबाबत श्री सिद्धिविनायक संस्थेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी माहिती दिली. तसेच युद्धात जायबंदी झालेल्या जवानांना पुण्यातली क्वीन मँरी टेक्निकल इन्स्टिटयूटच्या माध्यमातून 25 लाखांची करणार मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. श्री सिद्धिविनायक मंदीर न्यास विश्वस्त मंडळाच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे मंजूरीसाठी पाठवला आहे.
काय झालं पुलवामात?
जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा परिसरात सीआरपीएफच्या एका ताफ्याला लक्ष्य केलं. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
संबंधित बातम्या
Pulwama terror attack : प्रत्येक शहीदाच्या कुटुंबीयांना अमिताभ बच्चन देणार 5 लाख रुपये
शहीदांच्या कुटुंबांना 50 लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
'सिद्धिविनायक' कडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत, 51 लाखांची मदत जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement