एक्स्प्लोर

शेगाव दर्शन पॅटर्न पंढरपूर मंदिरात राबविण्यात यावा, विश्व वारकरी सेनेची मागणी

पंढरपूर येथे शेगाव दर्शन पॅटर्न राबविण्याची मागणी विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी केली आहे.शेगाव पॅटर्न राबविल्यास महिन्याला कमीत कमी एक लाख पन्नास हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

पंढरपूर : पांडुरंगाच्या दर्शनाची आषाढी वारीमध्ये भाविकांची गर्दी होऊ नये आणि गर्दी झाली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असे कारण सांगून सरकारने मंदिर बंद ठेवले आहे. पण जर शेगाव दर्शन पॅटर्न हा पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू करावा व भाविकांना ऑनलाईन पद्धतीने पास देऊन दर्शन द्यावे आज सरकारने विचार केला तर पूर्ण महिन्यात कमीत कमी एक लाख पन्नास हजार भाविक दर्शन घेऊ शकतील त्यामुळे पंढरपूर येथे शेगाव दर्शन पॅटर्न राबविण्याची मागणी विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी केली आहे.

काय आहे शेगाव दर्शन पॅटर्न...?

गेल्या अनलॉक वेळी मंदिरे तीन महिने उघडल्या गेली होती त्यावेळी शेगाव येथील गजानन महाराज संस्थान मध्ये एका दिवसात साडेपाच हजार भाविकांना कोरोना चे सर्व नियम पाळून दर्शन दिल्या जात होते . आधी ऑनलाइन पास काढून मंदिर प्रशासनाकडून मिळालेल्या दिवशी आणि मिळालेल्या वेळेतच मंदिरात प्रवेश मिळत होता. आणि ही प्रक्रिया सर्व ऑनलाईन असल्यामुळे ज्या भाविकांचा दर्शनाचा नंबर आहे तो भावीक त्या तारखेला ठरावीक वेळेवर तिथे उपस्थित राहत होता. त्यामुळे ना गर्दी ना गोंधळ....एका तासात 500 भाविकांना मंदिरात प्रवेश मिळत होता असे दिवसातून 11 स्लॉट मध्ये दररोज 5500 भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत होता . असाच पेटर्न पुढील महिनाभर पंढरपूर येथे लागू करावा अशी मागणी ह भ प थेटे महाराज यांची आहे.

जर पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समितीने ठरविले आपल्याला शेगाव पॅटर्न राबवून भाविकांना दर्शन द्यायचे आहे आणि सरकारने जर पुढाकार घेऊन होकार दिला तर एका दिवसाला साडे पाच हजार भाविक म्हणजे तीस दिवसांमध्ये एक लाख पन्नास हजार  भाविक कुठल्याही प्रकारचा गळबळ गोंधळ न होता कोरोनाचे सर्व नियम पाळून  दर्शन घेऊ शकतात आणि या नियोजनाने पंढरपूर मध्ये गर्दी होणार नाही दररोज तीन हजार 'भाविक जर पंढरपूर मध्ये दर्शनाला आले तर जे छोटे-मोठे व्यवसायिक आहेत त्यांनाही उपजीविकेचे साधन प्राप्त होईल कारण की पंढरपूर येथील व्यवसायिक मंडळींचा उदरनिर्वाह हा यात्रेकरू मंडळींच्या भरवशावर आहेत व्यवसायिक मंडळींनाही वाटतं पंढरपूर मध्ये वारकरी आले पाहिजे.

गेल्या दोन वर्षापासून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असल्यामुळे देवस्थानला फार मोठी आर्थिक झळ पोहोचलेली आहे. जर भाविक दररोज पांडुरंगाच्या दर्शनाला येत राहिले तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानला आर्थिक स्वरूपात फार मोठी मदत होऊ शकते.  कोरोना कालखंडामध्ये विठ्ठल रुक्मिणी समितीने कोरोनाशी निगडीत सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे.  त्यामध्ये क्वारंटाईन सेंटर, ऑक्सीजन सिलेंडर, माक्स, सॅनिटायझर किंवा आर्थिक स्वरूपात सर्वतोपरी मदत केली आहे.  जे भाविक पंढरपूर मध्ये येतील त्यांच्याजवळ कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असेल तरच पंढरपूर परिसरात प्रवेश दयावा. 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget