(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sheena Bora Murder Case : इंद्रायणी मुखर्जीच्या जामीन याचिकेवर सुप्रीम कोर्टाची सीबीआय आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस, दोन आठवड्यात मागितले उत्तर
Sheena Bora Murder Case : 2012 ला झालेल्या शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्रायणी मुखर्जी (Indrani Mukherji) हिच्या जामीन याचिकेवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्र सरकार आणि सीबीआयला नोटीस पाठवली आहे.
Sheena Bora Murder Case : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्रायणी मुखर्जी (Indrani Mukherji) हिच्या जामीन याचिकेवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्र सरकार आणि सीबीआयला नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. न्यायमुर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमुर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने इंद्रायणी मुखर्जीला जामीन नाकारला आहे. याबरोबरच मुंबई उच्च न्यायालयाच्या 16 नोव्हेंबर 2021 च्या आदेशाला आव्हान देत त्यांच्या याचिकेवर सीबीआय आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
न्यायमुर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमुर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने पाठवलेल्या नोटीसीचे दोन आठवड्यात उत्तर द्यावे, असे आदेश दिले आहेत. वकील मुकुल रोहतगी यांनी इंद्रायणी मुखर्जी हिजी बाजू कोर्टात मांडली आहे. ऑगस्ट 2015 मध्ये इंद्रायणी मुखर्जी हिला अटक करण्यात आली असून सध्या ती मुंबई येथील भायखळा महिला कारागृहात आहे.
स्वत: ची मुलगी शीना बोरा हिची हत्या केल्याचा आरोप इंद्रायणी मुखर्जीवर आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात या प्रकरणावर खटला सुरू आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयानेही इंद्रायणीला जामीन नाकारला आहे.
इंद्रायणी मुखर्जीसह तिचा चालक शामवर राय आणि पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना यांनी एप्रिल 2012 मध्ये एका कारमध्ये गळा दाबून शीनाची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्तेनंतर तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील एका जंगलात जाळला होता. या प्रकरणात हात असल्याच्या आरोपावरून इंद्रायणीचे दुसरे पती पीटर मुखर्जी यांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. अटकेत असतानाच पीटर मुखर्जी यांनी इंद्रायणी मुखर्जीला घटस्फोट दिला आहे.
महत्वाच्या बातम्या