NCP Crisis : अजित पवारांचा युक्तिवाद संपला, राष्ट्रवादीची पुढची सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार
Sharad Pawar Vs Ajit Pawar : पक्षातील सर्वाधिक आमदार आपल्याकडे असल्याचा दावा करत अजित पवारांनी पक्ष चिन्ह आपल्यालाच मिळावं अशी मागणी केली.
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी कुणाची (Nationalist Congress Party) या मुद्द्यावर निवडणूक आयोगात सुरू असलेली आजची सुनावणी संपली आहे. या पुढची सुनावणी ही 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रवादीत आतापर्यंत लोकशाही मार्गाने काम होत नव्हतं, शरद पवार आपले घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला. ज्या लोकांची शरद पवारांनी (Sharad Pawar) नियुक्ती केली त्याच पवारांनी त्यांची नियुक्ती कशी काय केली असा प्रश्नही अजित पवारांकडून उपस्थित करण्यात आला. तसेच सर्वाधिक आमदारांची संख्या आपल्यामागे असल्याचं सांगत पक्षही आपलाच असल्याचं अजित पवार गटाने युक्तिवाद केला.
सर्वाधिक आमदार आमच्यामागे, अजित पवार गटाचा दावा
राष्ट्रवादीतील सर्वाधिक आमदार आपल्यामागे असल्याचा दावा आज अजित पवार गटाकडून करण्यात आला. त्याआधारे पक्षाचे चिन्ह आपल्यालाच मिळावं अशी मागणीही केली. अजित पवार गटाकडून सादिक अली आणि पीए संगमा केसचा दाखला देण्यात आला.
सादिक अली केसमध्ये आमदारांच्या संख्येला महत्व देण्यात आलं होतं तर पीए संगमा प्रकरणी सर्वाधिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संख्या निर्णय देताना महत्त्वाची समजली होती.
शरद पवार मनमर्जी कारभार करतात, अजित पवार गटाचा दावा
शरद पवार हे आपल्या मर्जीप्रमाणे कारभार करतात, आपले घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात असा आक्षेप अजित पवार गटाकडून करण्यात आला. त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही नसल्याचा आरोपही करण्यात आला.
आजच्या सुनावणीत काय युक्तिवाद करण्यात आला?
- आमच्याकडे दीड लाखाहून अधिक शपथपक्ष आहेत.
- नियमानुसार नियुक्त्या केल्या जात नव्हत्या. शरद पवार आपले घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत आहेत.
- अजित पवार गटाकडून सादिक अली केसचा दाखला दिला. सादिक अली केसमध्ये आमदारांच्या संख्येला महत्व देण्यात आलं होतं.
- अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी राष्ट्रवादीची घटना वाचून दाखवली.
- जे स्वतः निवडून आले नाहीत ते इतरांच्या नेमणुका कशा करू शकतात. अजित पवार गटाचा शरद पवारांवर थेट आक्षेप.
- पदाधिकाऱ्यांच्या फक्त नियुक्त्या व्हायच्या, निवडणूक व्हायच्या नाहीत.
- आमच्याकडे एक लाखाहून शपथपत्रं आहेत, शरद पवारांकडे 40 हजार शपथपत्रं आहेत असं अजित पवार गटाने सांगितलं.
- शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले.
- ज्यांची निवड पवारांनी केली तेच पवारांची निवड कशी करू शकतात?
- पक्षात फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता- अजित पवार गट
- राष्ट्रवादी चिन्ह आम्हालाच मिळावं.
- अजित पवार गटाकडे किती आमदार आहेत हे जाहीर करावं, शरद पवार गटाची मागणी.
ही बातमी वाचा: