(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणारे एसटी कर्मचारी होते का? हे तपासले पाहिजे : जयंत पाटील
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणारे एसटी कर्मचारी होते का? हे तपासले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
Jayant Patil : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी आलेले खरंच एसटी कर्मचारी होते का? हे तपासले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. याबरोबरच या हल्ल्याच्या नागपूर कनेक्शनबद्दल पोलीस तपास करत असून त्याबाबत अधिक बोलणे सध्या योग्य होणार नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
नागपूर विमानतळावर जयंत पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, "संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शरद पवार यांच्या घरावरील आंदोलनाचे काम झालं नसावं. शरद पवार यांच्या घरावर आलेले खरंच एसटी कर्मचारी होते का? हे तपासले पाहिजे. याबरोबरच हे आंदोलक स्वतः आले की? त्यांना एकत्रित करून पाठवले याबाबत अजून माहिती समजली नाही."
"शरद पवार हे सुरक्षेच्या दृष्टीने कधी ही संरक्षणाकडे लक्ष देत नसतात. त्यामुळे हे लोक आणखी आत पोहचले असते तर काय घडलं असतं? याचा विचार आपण करू शकत नाही. त्यामुळे सिल्वर ओकवर झालेल्या आंदोलनाची गंभीर घटना आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
आंदोलनाच्या माध्यमातून शरद पवार यांना इजा पोहोचवण्याचा डाव असल्याचे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटवर बोलताना आम्हा सर्वांनाही तशीच शंका होती, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी दहशत पसरवत आहे, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, "महाविकास आघाडीचे सगळेच नेते शोषित (सततच्या ईडीच्या कारवाई ) असून आम्ही सहन करण्याचे काम करतोय. आम्ही कुणाबद्दल वाईट कृती करत नाही."
दरम्यान, देवेंद्र भुयार यांनी स्वाभिमानी पक्षातून काडीमोड घेतला. परंतु, त्यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशासंदर्भात त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या