एक्स्प्लोर

...तेव्हा अटल बिहारींकडून पवारांना ऑफर होती, प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट

‘1999 मध्ये केंद्रात आणि राज्यात सहभागी होण्याची ऑफर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिली होती.’ असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात केला.

कर्जत (रायगड) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला. ‘1999 मध्ये केंद्रात आणि राज्यात सहभागी होण्याची ऑफर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिली होती.’ असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘शरद पवारांना एनडीएमध्ये जाण्याची ऑफर होती. पण तत्वांशी तडजोड न करता पवार साहेबांनी त्यांना नकार दिला. जर त्यावेळी ऑफर स्वीकारली असती तर शरद पवार यांना NDA सरकारमध्ये क्रमांक दोनच पद मिळालं असतं.’ असंही ते यावेळी म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी यांची जवळीक असल्याची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजप यांचा राजकीय विचार वेगळा आहे हे पटवण्यासाठी 1999च्या ऑफरच उल्लेख प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात केला. ते रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील चिंतन बैठकीत बोलत होते. दरम्यान, याच भाषणात पटेलांनी शरद पवार 2019 मध्ये पंतप्रधान होऊ शकतात असं वक्तव्यही केलं. ‘2019 राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील. सध्या राजकारण ज्या दिशेने बदलत आहे त्यात आमच्या मनात पवार साहेबांच्याबद्दल जी इच्छा आहे ती गोष्ट अशक्य नाही. ते घडू शकतं.’ असंही यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले. पवार साहेब  तुम्ही सॉफ्ट राहणं सोडून द्या दरम्यान, यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांनी देखील काही सल्ले दिले. ‘पवार साहेब तुम्ही सॉफ्ट राहणं सोडून द्या. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जे बदनाम करत आहेत त्यांच्याबद्दल पवार साहेब तुम्ही खूप सॉफ्ट राहता.’ असं म्हणत पटेल यांनी पवारांनी आक्रमक भूमिका घ्यावी असंही सुचवलं. काँग्रेसबरोबर आपलं शत्रुत्व नाही ‘देशाच्या राजकारणात जे वातावरण तयार झालेलं आहे ते पाहता आपल्याला खुल्या मनाने काम करावं लागेल. काँग्रेसबरोबर आपलं शत्रुत्व नाही सध्या हे संबंध ‘कभी खुशी, कभी गम’ आहेत. 2014 निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढली असती तर 125 ते 140 जागांवर विजय मिळाला असता. विधान सभा-लोकसभा निवडणूक एकत्र येऊ शकतात,पक्षाचा ठोस कार्यक्रम ठरला पाहिजे आणि त्यावर काम केलं पाहिजे. असं शरद पवार यांना वाटतं.’ असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी 2019च्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापासून आघाडीचे संकेत दिले असले तरी आता ऐनवेळी काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संबंधित बातम्या : 2019ला शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, पटेलांचं अप्रत्यक्ष वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Sanjay Raut: नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Embed widget