एक्स्प्लोर

हिंदीला दिली ओसरी अन् हातपाय पसरी, हिंदीला देण्यात येणारं प्रोत्साहन वेळीच थांबवा, रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

राज्य शासनाच्या हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज्यात प्रचंड वाद निर्माण झाला आहे. यावर शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Rohini Khadse : राज्य शासनाच्या हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज्यात प्रचंड वाद निर्माण झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. हिंदीचे प्रोत्साहन वेळीच थांबले पाहिजे नाहीतर 'हिंदीला दिली ओसरी हिंदी हातपाय पसरी' असं आपल्या सोबत व्हायचं असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे. 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...' त्यात एक ओळ आहे. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी... आपुल्या घरात हाल सोसते मराठी...ही ओळ कालच्या जीआरला शोभणारी आहे असं खडसे म्हणाल्या.

शालेय विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याबाबत अनिवार्य शब्द मागे घेण्यात आलाय. मात्र तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबलं जाणार आहे. हिंदीऐवजी तिसरी भाषा शिकायची असल्यास वर्गामध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इतर भाषा विषय शिकण्याची इच्छा दर्शवणं गरजेचं असेल, असा अध्यादेश समोर आणला. यावरुन रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे.

पहिलीपासून तिसऱ्या भाषेला जोरदार विरोध झाला होता. त्यानंतर हिंदीची सक्ती मागे घेण्यात आली होती. पण काल का कुणास ठाऊक पुन्हा तिसरी भाषा म्हणून हिंदीचा जीआर काढण्यात आला. आपल्या राज्यात मराठी भाषेचे प्रचंड हाल आहेत, शाळा वाचवण्यासाठी कोणते अनुदान नाही की धोरण नाही पण हिंदीला मात्र प्रोत्साहन दिले जात आहे. हे वेळीच थांबले पाहिजे नाहीतर, 'हिंदीला दिली ओसरी हिंदी हातपाय पसरी' असं आपल्या सोबत व्हायचं अशी भीती रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली.

राज ठाकरेंचीही टीका

जी भाषा सक्तीची नाही जीचा काही उपयोग नाही अशी भाषा शिकवू नका. सरकारच्या छुप्या मार्गाने भाषा शिकवण्याला बळी पडू नका अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू.  आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का? गुजरात सरकारचा जीआर आहे पहिलीपासून गुजराती, गणित आणि इंग्रजी भाषा सक्तीची आहे. तिथ देखील हिंदी भाषेची सक्ती नाही. महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील बंधू भगिनी शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासाठी ही माझी पत्रकार परिषद आहे. लेखक, साहित्यिक, कलाकार यांना विनंती आहे की तुम्ही यावर बोलायला हवं. मराठी संपवून हे टाकतील. शाळा हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू… सरकारला हे आव्हान वाटत असेल तर ते त्यांनी आव्हान समजावं. मोदी, अमित शाह यांच्या राज्यात सक्ती नाही मग महाराष्ट्रात का? 

महत्वाच्या बातम्या:

Raj Thackeray on Hindi: उत्तरेतील आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा दबाव ते हिंदीचं एकही पुस्तक विकू देणार नाही, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

महत्त्वाच्या बातम्या

आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
Ratnagiri News: नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
Vishakha Raut : रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget