Sharad Pawar on Maharashtra Election : इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असून कोल्हापूरमध्ये त्यांचा आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे. दुसरीकडे, परळी तालुक्यातील राजेभाऊ फड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला
Sharad Pawar on Maharashtra Election : सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, तुमच्या भागात सत्तेचा दुरपयोग केला जातो. जो आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातो, राजकारण हे समाजकारणाला स्थान देणार पाहिजे. देशात चित्र बदलत आहे, लोकसभा निवडणूक आधी सुद्धा ते दिसलं. प्रधानमंत्री सांगत होते 400 पार निवडून येणार, पण आले किती त्यांचे खासदार? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असून कोल्हापूरमध्ये त्यांचा आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे. दुसरीकडे, परळी तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते राजेभाऊ फड यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी महायुतीला इशारा दिला. राजाभाऊ फड धनंजय मुंडेंविरोधात उतरण्याची शक्यता आहे.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रदेश कार्यालय, मुंबई येथे रा. स. प. पक्षाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष श्री. राजेश फड, अजित पवार गटाचे श्री. सोपानराव तोंडे, श्री. विक्रम… pic.twitter.com/4QHWdIYLH0
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) September 25, 2024
शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या, त्यापैकी 8 जागा जिंकून आणल्या. आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजपासोबत सत्तेत जाऊन बसले, लोकांची फसवणूक या लोकांनी केली आहे. सत्तेमध्ये सहभागी झाले. ही तर फक्त सुरुवात आहे. परळीमध्ये मोठी सभा आपण घेऊ आणि दाखवून देऊ. आता फक्त दोन महिने राहिले आहेत. राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा एल्गार शरद पवार यांनी केला.
राजेभाऊ फड हे कन्हेरवाडी गावचे सरपंच आहेत. परळी विधानसभेला ते महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, असे म्हटले जात आहे. फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. त्यांना उमेदवारी दिली तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर राजाभाऊ फड यांचे आव्हान राहू शकते.
धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका
शरद पवार म्हणाले की, सत्तेचा गैरवापर तुमच्या भागात केला जातो. अनेकांना त्रास दिला जातो. सत्ता सामान्य माणसाला यातना देण्यासाठी कशी वापरायची हे तुमच्या ठिकाणी दिसते. आमच्या नावावर निवडून आले आणि सत्तेत जाऊन भाजपसोबत बसले आणि लोकांची फसवणूक केली. राजकारण हे समाजकारणाला साथ देणारे असले पाहिजे, असं राजकारण मान्य नाही म्हणून फड यांनी पक्षात येण्याचा निर्णय घेतला. ही तर सुरुवात आहे, परळीत एक मोठी सभा आपण घेणार आहोत.
इतर महत्वाच्या बातम्या