एक्स्प्लोर
Advertisement
दुष्काळग्रस्त बीडमधील 'शांतीवन'ची जलसंधारण चळवळ, विहिरी तुडुंब भरल्या
बीड : मराठवाड्यात दुष्काळाचं विक्राळ रुप आपण यापूर्वी बघितलं आहे. साहजिकच याच दुष्काळाचा फटका 'शांतीवन'लाही बसल्यानंतर या दुष्काळावर मात करण्यासाठी शांतीवनमध्ये एक विशेष योजना राबविण्यात आली आहे. ती म्हणजे दुष्काळमुक्त शांतीवन.
पूर्वी वर्षातील सहान महिने शांतीवनला पाणी विकत घ्यावं लागतं होतं. यासाठी 10 ते 12 लाख रुपये एवढा खर्च व्हायचा. यावर उपाय म्हणून दुष्काळमुक्त शांतीवन ही संकल्पना समोर आली आणि शांतीवनने जलसंधारणाची चळवळ हाती घेतली.
बाबा आमटे यांच्याकडून समाजसेवेचा वसा घेवून दीपक आणि कावेरी नागरगोजे या दाम्पत्याने हे शांतीवन उभे केले आहे. शिरुर तालुक्यातील आर्वी या ठिकाणी मागच्या सोळा वर्षांपासून ऊसतोड कामगाराच्या मुलासाठी निवासी वसतिगृह चालवत आहेत. आज त्यांच्या वसतिगृहात 300 मुलं शिकत आहेत. तर एक हजार मुले या प्रकल्पात शिक्षण घेत आहेत. ज्यांचा जन्मच उसाच्या फडात होतो, त्या मुलांना लेखणीच्या आधीच कोयत्याची भाषा कळते. शिवाय, पित्याचं छत्रही नसतं. अशा मुलांसाठी शांतीवन आधार बनून उभी राहते.
मागच्या वर्षी नाम फाऊंडेशनने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पुनर्वसन प्रकल्प शांतीवनमध्येच सुरु केला. नाम फाऊंडेशन या परिसरात वसतिगृहाची इमारत बांधत आहे. आज या प्रकल्पात सव्वाशे मुलं राहत आहेत. या मुलांच्या राहण्यापासून शिक्षणापर्यंतची सगळी जबाबदारी शांतीवन उचलत आहे.
या सगळ्या कामात कावेरी नागरगोजे स्वत:ला झोकून देऊन काम करत आहेत. दीपक आणि कावेरी हीच जणू या चिमुकल्यांसाठी आई-वडील आहेत. सुरुवातीच्या काळात शांतीवनमध्ये मुलींची संख्या कमी होती. आता मात्र या प्रकल्पात मुलींची संख्या लक्षणीय आहे. इथून शिक्षण घेतलेल्या काही मुली या पुढच्या शिक्षणासाठी पुणे-मुंबईच्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत.
एकट्या बीड जिल्ह्यातून दरवर्षी सहा लाखांपेक्षा जास्त ऊसतोड कामगार हे राज्यात आणि राज्याबाहेर भटकंती करत असतात. या काळात अनेक मुलं हे उसाच्या फडात हाती कोयता घेऊन खेळत असतात. शांतीवनने याच मुलांसाठी शिक्षणासाठी मोहीम सूरु केली. आता निसर्गाने ही शांतिवनला भरभरुन दिलं आहे म्हणूनच दुष्काळमुक्त शांतीवन सध्या तरी पाण्याबाबतीत कोट्यधीश आहे, असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement