Shaktipeeth Highway : भक्ताची जमीन कोणत्याही देवाला चालत नाही, फक्त एका 'देवा'लाच शेतकऱ्यांची सुपीक जमीन लागते; जयंत पाटलांचा फडणवीसांवर बोचरा वार
Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गावरून जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत शेतकऱ्यांच्या जमिनींच्या प्रश्नावर सरकारला इशारा दिला आहे.

सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Highway) मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. वाळवा तालुक्यातील शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी 'भक्ताची जमीन कोणत्याही देवाला चालत नाही, पण राज्यातल्या एका विशिष्ट देवाला मात्र चालते' असा टोला लगावला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Sangli Farmer Protest : शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
शक्तिपीठ महामार्गामुळे वाळवा तालुक्यातील सुपीक बागायती जमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. मागणी नसताना हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला जात असल्याचा आरोप या मेळाव्यात करण्यात आला.
Jayant Patil Vs Devendra Fadnavis : फडणवीसांना थेट आवाहन
जयंत पाटील म्हणाले की, “आम्हाला सर्व देव पावले आहेत, पण एकच देव पावायचा राहिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जुना रस्ता पाहावा किंवा अन्य पर्याय शोधावा, पण हा विनाशकारी रस्ता रद्द करावा. मागणी नसताना हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे."
Sangli Natural vs Manmade Crisis : नैसर्गिक संकट विरुद्ध मानवनिर्मित संकट
वाळवा तालुका दरवर्षी कृष्णा आणि वारणेच्या महापुराचा सामना करतो, मात्र तो नैसर्गिक आहे. पण शक्तिपीठ महामार्ग हे ‘मानवनिर्मित संकट’ ठरेल. शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून रस्ता बांधणे हे कोणत्याच देवाला मान्य नाही, असं जयंत पाटील म्हणाले.
Shaktipeeth Mahamarg : क्रांतीकारी परंपरेची आठवण
सरकारला इशारा देताना जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्याच्या क्रांतिकारी इतिहासाची आठवण करून दिली. क्रांतीसिंह नाना पाटलांचा वारसा असलेल्या या भागात अन्यायाविरुद्ध लढण्याची परंपरा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजूट होऊन या संकटाचा सामना करावा, असं आवाहन त्यांनी केलं.
Shaktipeeth Highway Protest : प्रश्नाला भावनिक आणि राजकीय वळण
पश्चिम महाराष्ट्रातील सुपीक जमिनींचा प्रश्न आता भावनिक आणि राजकीय वळण घेत असल्याचे या मेळाव्यावरून स्पष्ट झाले आहे. भक्ताची जमीन हिरावून घेणारा रस्ता कोणत्या देवाला हवाय? वाळव्याच्या शेतकऱ्याचा विरोध हा केवळ रस्त्याला नसून, आमच्या अस्तित्वावर येणाऱ्या गदेला आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सामना करा, अंस आवाहन जयंत पाटील यांनी केलं.
ही बातमी वाचा:
Before You Go
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
महत्त्वाच्या बातम्या





















